Healthy Fruits: आरोग्यासाठी वरदान ठरणारी ही 5 फळे; रोजच्या आहारात समावेश केल्यास आजारांपासून मिळेल संरक्षण

मुंबईच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे आज अनेकजण कळत-नकळत जंक फूडकडे वळत आहेत. कारण हा पर्याय सहज-सगळीकडे उपलब्ध असल्यामुळे एका क्लीकवर काही क्षणांत हे पदार्थ मागवता येतात. परंतु

Healthy Fruits: आरोग्यासाठी वरदान ठरणारी ही 5 फळे;  रोजच्या आहारात समावेश केल्यास आजारांपासून मिळेल संरक्षण

मुंबईच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे आज अनेकजण कळत-नकळत जंक फूडकडे वळत आहेत. कारण हा पर्याय सहज-सगळीकडे उपलब्ध असल्यामुळे एका क्लीकवर काही क्षणांत हे पदार्थ मागवता येतात. परंतु बाहेरून आकर्षक वाटणारे हे पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात. कारण अशा पदार्थांचे वारंवार सेवन केल्यामुळे पोट, यकृत, आतड्यांवर वाईट परिणाम होऊन पचनसंस्थेत मोठा अडथळा निर्माण होतो.

तसेच शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्त्व मिळत नाहीत आणि अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत डॉक्टर नेहमीच आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. फळांमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. अशीच 5 फळे आहेत जी तुमच्या रोजच्या आहारासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतात.

हेही वाचा – Turmeric Water Benefits: नितळ आणि चमकदार त्वचेसाठी हळदीचं पाणी ठरेल फायदेशीर? रोज सकाळी पिण्याचे फायदे जाणून घ्या

1. सफरचंद – आरोग्याचा खजिना
रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज भासत नाही, असे म्हटले जाते. यात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही सफरचंद उपयुक्त आहे.

2. केळे – त्वरित ऊर्जा देणारे फळ
केळे हे सर्वात सोपे आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. मऊ असल्याने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही ते सहज खाऊ शकते. यात ऊर्जा, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी6 मोठ्या प्रमाणात असते. थकवा आल्यावर किंवा व्यायामानंतर केळे खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही ते मदत करते.

3. नाशपाती/पेर – शरीराला हायड्रेट ठेवणारी
नाशपातीमध्ये पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. पिकलेली नाशपाती खाणे शरीरासाठी खूप सौम्य आणि थंडावा देणारे असते. विशेषत: उष्णतेमध्ये शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पचन सुरळीत ठेवण्यासाठी नाशपातीचा आहारात समावेश करावा.

4. पपई – पचनासाठी सर्वोत्तम
पपई हे मऊ आणि पचायला अतिशय सोपे फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. पोट साफ न होणे, अपचन यांसारख्या समस्यांवर पपई हे रामबाण उपाय आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचा तेजस्वी ठेवण्यासाठीही पपई गुणकारी आहे.

5. टरबूज – उन्हाळ्यातील संजीवनी
सध्या वाढत्या उष्ण आणि दमट हवामानात टरबूज खाणे अत्यंत फायदेशीर आहे. यात 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते, त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि थकवा दूर होतो.

तज्ज्ञांच्या मते, ही फळे नियमितपणे खाल्ल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते. मात्र, आपण एखाद्या आजाराने ग्रस्त असाल किंवा नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळांचे सेवन करावे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number