Home Remedies In Rainy season : पावसात भिजलायं, सर्दी – खोकला झालायं? करा हे पाच घरगुती उपाय, आजाराला करा टाटा Bye Bye!

सध्या जोरदार पाऊस बसरण्यास सुरूवात झाली आहे. अशावेळी शाळा – काॅलेजला जाणारे, कामानिमित्त घराबाहेर पडणारे किती काळजी घेतली तरी थोड्याफार प्रमाणात फिजतातचं. परिणामी, पावसाळ्या सर्दी-खोकला होण्याचे प्रमाण वाढते. मात्र एकदा हे आजार झाले की, ते पटकन बरे होत नाहीत. दरम्यान, काही घरगुती उपाय करून यावर मात करता येऊ शकते. तुम्हालाही सर्दी आणि खोकल्यापासून दूर राहायचे असेल, […]

Home Remedies In Rainy season : पावसात भिजलायं, सर्दी – खोकला झालायं? करा हे पाच घरगुती उपाय, आजाराला करा टाटा Bye Bye!

सध्या जोरदार पाऊस बसरण्यास सुरूवात झाली आहे. अशावेळी शाळा – काॅलेजला जाणारे, कामानिमित्त घराबाहेर पडणारे किती काळजी घेतली तरी थोड्याफार प्रमाणात फिजतातचं. परिणामी, पावसाळ्या सर्दी-खोकला होण्याचे प्रमाण वाढते. मात्र एकदा हे आजार झाले की, ते पटकन बरे होत नाहीत. दरम्यान, काही घरगुती उपाय करून यावर मात करता येऊ शकते. तुम्हालाही सर्दी आणि खोकल्यापासून दूर राहायचे असेल, तर या सोप्या उपायांचा नक्की उपयोग करून बघा. 

मध आणि आल्याचा रस

सर्दी खोकल्यापासून सुटका करण्यासाठी मध आणि आल्याचा रस एकत्र करून त्याचे सेवन करू शकता. आले आणि मधाचा रस हा हलकासा गरम करा आणि त्वरीत प्या. तुम्हाला अति सर्दी झाली असेल तर मात्र हा इलाज लागू होणार नाही. घरगुती उपाय करूनही जर बरं वाटत नसेल तर त्वरीत डॉक्टरांना संपर्क करा.

तुळस – आल्याचा चहा

तुम्ही पावसाळ्यात भिजत असाल तर तुळस – आल्याचा चहा नक्की प्यावा. हा चहाच्या सेवनाने सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळतो. तुळस आणि आल्यामध्ये औषधीय गुणधर्म असल्याने प्रतिकारशक्ती वाढवून आरोग्याला फायदा मिळतो. पाण्यात तुळस, आल्याचे तुकडे घालून उकळून घ्या. नंतर गाळून हा चहा प्या.

हेही वाचा : Kitchen Hacks: पावसाळ्यात डाळ-तांदूळ होतात खराब? फक्त 5 घरगुती उपाय करा, महिनोनमहिने कीडही फिरकणार नाही

मध

मध हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असणारा घटक आहे. सर्दी आणि खोकल्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. मधाचे सेवन केल्याने खोसला कमी होतो. मध आणि लवंग एकत्र घेऊन याचे सेवन करू शकता. लवंग ठेचून मधामध्ये मिक्स करा आणि दिवसातून 2-3 वेळा सेवन करा. 

कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या करा

सर्दी – खोकला आणि घशात खवखव जाणवत असेल, कफ साचत असेल तर कोमट पाण्याच्या गुळण्या करून ते कमी करता येईल. यामुळे कोणताही त्रास होत नाही. कोमट पाण्यात मीठ मिक्स करून पाण्याच्या गुळण्या केल्यास, घसादुखी लवकर कमी होईल आणि कफ निघून जाण्यास मदत होते. तसंच घशाला आलेली सूज कमी होते. 

गरम पाण्याची वाफ

सर्दी-खोकल्यापासून दूर जायचा उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ घेतल्याने नाक उघडते आणि श्वास घेणे शक्य होते. तुम्ही पाणी गरम करून त्यात टी ट्री ऑईल, लवंग तेल, युकेलिप्टस ऑईल, लेमनग्रास ऑईल, निलगिरी मिक्स करून वाफ घेतली तर सर्दी – खोकला लवकर कमी होण्यास मदत होते. घशाची खवखव कमी होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number