ऑफिस असो, कौटुंबिक कार्यक्रम असो किंवा सण-वार… प्रत्येक ठिकाणी आपला लूक हटके आणि सोज्वळ दिसावा, असं प्रत्येकालाच वाटतं. केसांच्या स्टायलिंगपासून पायातल्या चप्पलपर्यंत प्रत्येक गोष्ट आपण विचार करून निवडतो. मेकअप हलका असला तरी चालतो, मात्र दागिन्यांची निवड मात्र अचूक असणं गरजेचं असतं.
मैत्रिणींचे सल्ले, सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स आणि वेगवेगळे स्टायलिंग ट्रेंड्स यामुळे अनेकदा नेमकं काय करावं, याचा गोंधळ होतो. पण Jewellery Styling करताना काही छोट्या चुका टाळल्या, तर तुमचा साधा लूकही खुलून दिसू शकतो.
म्हणूनच Jewellery Styling मधल्या या छोट्या चुका लक्षात ठेवा आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करा… कारण योग्य दागिना तुमचा लूक बदलू शकतो आणि प्रत्येक कार्यक्रमात तुमची स्टाइल उठून दिसू शकते!
1. एक कानात वेगळं, दुसऱ्यात वेगळं? हो, हा Trend आहे!
Perfect matching earrings च्या ऐवजी similar पण identical नसलेले earrings वापरता येतात. ऑफिसमध्ये subtle studs आणि traditional look मध्ये mismatched oxidised earrings ट्राय करता येतात.
2. नेकलेस नकोच! फक्त Earrings वर करा फोकस
Collar-neck किंवा high-neck outfit असेल तर necklace घालण्याची गरज नाही. मोठे earrings + clean neckline हा look जास्त elegant दिसू शकतो.
3. ज्वेलरी कपड्यांवर नाही, Skin Tone वर निवडा
Goldish jewellery warm undertones वर उठून दिसू शकते, तर oxidised jewellery अनेकदा deeper contrast देते. हाताच्या veins पेक्षा प्रत्यक्ष चेहऱ्याजवळ jewellery hold करून पाहा—काय जास्त fresh दिसतं ते लगेच कळतं.
4. साडीला Necklace नको, फक्त एक Brooch!
Traditional look मध्ये नेहमी necklace आणि earrings करण्याऐवजी साडीच्या पल्लूवर एक statement brooch लावा. अगदी simple साडीही instantly styled दिसते.
5. Watch + Bracelet हा Combo ट्राय केलाय?
एका हातात watch आणि दुसऱ्या हातात बांगड्यांचा stack करण्यापेक्षा watch च्याच हातात एक slim bracelet ठेवा. Office look मध्ये हा combination subtle पण stylish दिसतो.
Beauty Tips: बर्फ की गरम पाण्याची वाफ? तुम्ही सुद्धा गोंधळात असाल तर हे नक्की वाचा!
6. Hair Open असेल तर Earrings बदलतात!
केस मोकळे असतील तर छोटे studs हरवून जाऊ शकतात. अशावेळी medium hoops किंवा drop earrings जास्त visible दिसतात. Bun/ponytail असेल तर छोटे earringsही उठून दिसतात.
7. Oxidised Jewellery फक्त Kurti साठी नाही!
Plain white shirt + oxidised earrings किंवा black top + oxidised necklace असा Indo-Western look ऑफिससाठीही करता येतो.
8. जुनी Jewellery पुन्हा New दिसू शकते!
आईची किंवा आजीची जुनी oxidised chain, pendant किंवा earrings एकाच वेळी सगळे न घालता modern outfit सोबत एक piece म्हणून वापरा. Vintage + modern असा वेगळा look तयार होतो.
9. एकाच रंगाची Jewellery नको—एकच Texture ठेवा
Goldish आणि oxidised mix करताना रंगांपेक्षा texture आणि design family जवळची ठेवा. त्यामुळे mix-and-match असूनही लूक random वाटत नाही.
10. “Jewellery Break” घ्या!
प्रत्येक outfit सोबत दागिने घालायची गरज नाही. काही दिवस फक्त watch + tiny studs असा clean look ठेवा. दुसऱ्या दिवशी statement earrings घातल्यावर ते आणखी उठून दिसतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.