How To Reduce Puffy Face: सकाळी उठल्यावर चेहरा फुगलेला दिसतोय? सावधान! हे असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण

झोपण्याची स्थितीही या समस्येला वाढवू शकते. आपण सरळ झोपल्यावर शरीरातील द्रव ऊतींमध्ये, विशेषतः डोळ्यांच्या आसपास साचतो.

How To Reduce Puffy Face: सकाळी उठल्यावर चेहरा फुगलेला दिसतोय? सावधान! हे असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण

सकाळी उठल्यानंतर डोळ्यांभोवती सूज येणे किंवा चेहरा फुगलेला दिसणे ही समस्या अनेकांना जाणवते. यामागे उशिरापर्यंत जागरण, अपुरी झोप किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणे अशी साधी कारणे असू शकतात. मात्र ही लक्षणे वारंवार दिसू लागली, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. काही वेळा हीच सूज किडनीच्या आजाराची सुरुवातीची खूण असू शकते.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, किडनीच्या समस्यांकडे आपण बहुतेक वेळा फक्त लघवीतील बदलांशी जोडून पाहतो. पण किडनीचे कार्य बिघडल्यास शरीराच्या इतर भागांमध्येही लक्षणे दिसू शकतात. विशेषतः सकाळच्या वेळी डोळ्यांभोवती येणारी सूज ही एक महत्त्वाची सुरुवातीची खूण असू शकते. या अवस्थेला ‘पेरिऑर्बिटल पफिनेस’ असे म्हणतात.

किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास शरीरातील ‘अल्ब्युमिन’ नावाचे प्रोटीन लघवीतून बाहेर पडू लागते. हे प्रोटीन रक्तवाहिन्यांमध्ये द्रव टिकवून ठेवण्यास मदत करते. जेव्हा किडनीतील सूक्ष्म फिल्टरिंग यंत्रणा खराब होते, तेव्हा अल्ब्युमिनची गळती सुरू होते. त्यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण होते आणि द्रव ऊतींमध्ये साचू लागतो. यामुळे डोळ्यांभोवती आणि चेहऱ्यावर सूज दिसू लागते.

हेही वाचा: Grazing Land: राज्यातील 30 लाख कुटुंबांना राज्य सरकारचा दिलासा; गायरान जमिनींवरील अतिक्रमणासंदर्भात घेतला 'हा' मोठा निर्णय

झोपण्याची स्थितीही या समस्येला वाढवू शकते. आपण सरळ झोपल्यावर शरीरातील द्रव मऊ ऊतींमध्ये, विशेषतः डोळ्यांच्या आसपास साचतो. मात्र दिवसभर चालणे-फिरणे सुरू झाल्यावर गुरुत्वाकर्षणामुळे हे द्रव खाली पायांकडे सरकतो, त्यामुळे चेहऱ्यावरील सूज काही प्रमाणात कमी झालेली दिसते.

याशिवाय, अपुरी झोप, ॲलर्जी, शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) किंवा जास्त मीठाचे सेवन यामुळेही सूज वाढू शकते. किडनीच्या समस्यांबरोबरच लघवीत फेस येणे, टाचांमध्ये सूज येणे, सतत थकवा जाणवणे किंवा रक्तदाब वाढणे ही लक्षणेही गंभीर संकेत ठरू शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कुटुंबात किडनीच्या आजार असेल, तर अशा लक्षणांकडे अधिक जागरूकतेने पाहणे गरजेचे आहे. वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतो. 

आरोग्य सूचना (Health Disclaimer): येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. कोणत्याही आजाराचे निदान, उपचार किंवा औषधोपचार करण्यापूर्वी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.

हेही वाचा: NHAI Summer Internship: इंटर्नशिपसह दरमहा आकर्षक पगार कमावण्याची संधी, असा करा ऑनलाईन अर्ज

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number