Tuesday, November 11, 2025 09:53:50 PM

Nail Polish Side Effects: नेल पॉलिश वापरताय? सावधान! तुमच्या या सवयीमुळे त्वचेला कर्करोगाचा धोका वाढू शकतो

आजच्या घडीला सौंदर्य आणि फॅशनच्या नावाखाली अनेक उत्पादने वापरली जातात, त्यात नेल पॉलिश म्हणजेच नेल पेंट हा महत्त्वाचा भाग मानला जातो.

nail polish side effects नेल पॉलिश वापरताय सावधान तुमच्या या सवयीमुळे त्वचेला कर्करोगाचा धोका वाढू शकतो

Nail Polish Side Effects: आजच्या घडीला सौंदर्य आणि फॅशनच्या नावाखाली अनेक उत्पादने वापरली जातात, त्यात नेल पॉलिश म्हणजेच नेल पेंट हा महत्त्वाचा भाग मानला जातो. आकर्षक नखे कोणाला नको असतात? मात्र, या सौंदर्यप्रसाधनांच्या नियमित वापरामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

नेल पॉलिशमध्ये कोणते रसायन असते आणि ते घातक का?
अनेक नामांकित ब्रँडच्या नेल पॉलिशमध्ये फॉर्मल्डिहाइड, टोल्यून आणि डायब्यूटाइल फ्थेलेट ही रसायने आढळतात. ही रसायने दीर्घकाळ शरीरात गेल्यास त्वचेच्या पेशींना नुकसान पोहचवतात. अनेक संशोधन अहवालानुसार, या केमिकल्समुळे त्वचेच्या पेशींमध्ये डीएनए लेव्हलवर बदल होतात, जे पुढे जाऊन त्वचा कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे कारण ठरू शकतात.

हेही वाचा: Skin Tips: झोपण्यापूर्वी हे स्किनकेअर रुटीन फॉलो केल्याने तुमची त्वचा ग्लो करेल, जाणून घ्या...

UV नेल ड्रायरचा धोका काय आहे?
अलीकडच्या काळात जेल मॅनिक्युअर प्रचंड लोकप्रिय झालं आहे. पण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या UV लाइटचा त्वचेवर घातक परिणाम होतो. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात आढळले की केवळ 20 मिनिटांच्या UV एक्सपोजरमुळे 20-30% पेशी नष्ट होतात, तर सतत वापर केल्यास ही संख्या 60-70% पर्यंत जाऊ शकते. यामुळे त्वचेतील पेशींची झपाट्याने हानी होते आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

कोणत्या लोकांनी अधिक काळजी घ्यावी?

  • गर्भवती महिलांनी नेल पॉलिशपासून शक्यतो दूर राहणे योग्य.

  • लहान मुलांना नेल पेंटपासून लांब ठेवावे.

  • ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास आहे, त्यांनी नेहमी काळजी घ्यावी.

  • नियमित जेल पॉलिश आणि UV लाइट वापरणाऱ्यांनी वापराचं प्रमाण कमी करावं.


हेही वाचा: Gram Flour Face Pack: सौंदर्यासाठी बेसन वापरताय? त्वचेवर होऊ शकतात 'हे' गंभीर दुष्परिणाम; जाणून घ्या सविस्तर

काय काळजी घ्यावी?

  • दररोज नेल पेंट लावणे टाळा.

  • महिन्यातून किमान एक-दोन आठवडे नखांना विश्रांती द्या.

  • शक्य असल्यास नॉन-टॉक्सिक आणि ट्रान्सपेरंट नेल पॉलिशचा वापर करा.

  • जेल मॅनिक्युअर करताना UV लाइटपासून हातांचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन किंवा UV ग्लोव्हज वापरा.

सौंदर्य जपणं जितकं महत्त्वाचं, तितकंच आरोग्य जपणंही आवश्यक आहे. फॅशनच्या नादात आपले आरोग्य धोक्यात घालणं कधीही योग्य नाही. त्यामुळे नेल पॉलिशचा वापर करताना त्यातील घटक, वापरण्याची वेळ आणि पद्धत याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे. सौंदर्याची काळजी घेताना थोडी माहिती आणि सावधगिरी हीच तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकते.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री