Sunday, July 13, 2025 10:38:04 AM

Rainy Season Alert: पावसाळ्यात 'या' भाज्या टाळाच! एक चुकीचा निर्णय ठरू शकतो आरोग्यास धोकादायक

पावसाळ्यातील आर्द्र हवामान आरोग्याला घातक ठरू शकतं. बुरशी, फूड पॉयझनिंग, त्वचा विकार यापासून बचावासाठी काही भाज्यांचे सेवन टाळणे आणि योग्य साठवण आवश्यक आहे.

rainy season alert पावसाळ्यात या भाज्या टाळाच एक चुकीचा निर्णय ठरू शकतो आरोग्यास धोकादायक

Rainy Season Alert: पावसाळा म्हणजे निसर्गाची उधळण, थंड हवामान, आणि ताजेतवाने वाटणारे वातावरण! पण या ऋतूचं दुसरं रूप म्हणजे बुरशी, जीवाणू आणि संसर्गांचा धोका. हवेत वाढलेली आर्द्रता आणि साचलेलं पाणी यामुळे आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. विशेषतः पावसाळ्यात पचनसंस्था नाजूक बनते आणि जर योग्य अन्ननिवड केली नाही, तर फूड पॉयझनिंग, अपचन, त्वचा विकार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

पालेभाज्यांपासून सावध
पालक, पत्ता कोबीसारख्या पालेभाज्या नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. पण पावसाळ्यात या भाज्या टाळाव्यात. कारण या भाज्यांवर बुरशी आणि कीटक सहज वाढतात. धुतल्यावरही त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतातच असं नाही. त्यामुळे अशा काळात पालेभाज्यांचे सेवन टाळणेच उत्तम.

हेही वाचा: Satara Tourism: साताऱ्यातील 'ही' पर्यटनस्थळे 20 ऑगस्टपर्यंत राहणार बंद; जाणून घ्या

मशरूम खाणं धोकादायक
बाहेरून टवटवीत दिसणारा मशरूम पावसाळ्यात आतून सडलेला असण्याची शक्यता असते. त्यातील बुरशी पाचनसंस्थेला अपायकारक ठरू शकते. पावसाच्या ओलसर हवेमुळे मशरूम पटकन खराब होतो आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो.

फूलकोबी, कोबी आणि ब्रोकोली नकोच
या भाज्यांमध्ये असलेल्या छोट्या फटींमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे त्यात जीवाणूंची वाढ होते. स्वच्छ धुतले तरीही आतमध्ये असलेले सूक्ष्म कीटक आणि बुरशी सहज नष्ट होत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्यांचा वापर टाळावा.

वांग्याचे दुष्परिणाम
पावसात वांग्यांमध्ये कीटक आणि अल्कलॉइडचं प्रमाण वाढतं. यामुळे त्वचेला खाज, पुरळ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. पचनावरही परिणाम होतो. त्यामुळे या काळात वांगी खाणं टाळावं.

हेही वाचा:Today's Horoscope: तुमचं ग्रहमान काय सांगतं? जाणून घ्या आजचं राशीफल

कांदा-लसूण योग्य प्रकारे साठवा
ओलसर हवेत कांदा आणि लसूणवर बुरशी वाढते आणि त्यातून तयार होणारे टॉक्सिन्स यकृतासाठी अपायकारक ठरतात. त्यामुळे हे पदार्थ पावसात योग्य प्रकारे साठवणं गरजेचं आहे, अन्यथा ताजे वापरणेच शहाणपणाचं.

पावसाळ्यात आहारात योग्य बदल करून आरोग्याचे रक्षण करता येते. ‘स्वच्छ वाटतं म्हणून ते आरोग्यदायी आहे’ हे समजून घेणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कोणती भाजी खावी, कोणती टाळावी हे समजून घ्या आणि स्वतःचं व कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवा.


सम्बन्धित सामग्री