Mango Ice Cream : रसाळ आंब्यांचा थंडगार आस्वाद; अशा सोप्या पद्धतीने बनवा मँगो आईस्क्रीम!

सध्या आंब्यांचा सीजन सुरू आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वर्षातून एकदाच येणाऱ्या आंब्यांच्या सीजनचा मनमुराद आनंद खव्वये लुटतात. आंबा कापून, रस बनवून, मिल्कशेकमध्ये, आंबा बर्फी बनवून अशा विविध पद्धतीने त्याचा आस्वाद घेता येतो. मात्र उन्हाळ्यात आंब्याचे थंडगार आईस्क्रीम मनाला आणखीनच सुखावते. हे क्रीम आणि टेस्टी मँगो आईस्क्रीम आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीनेही […]

Mango Ice Cream : रसाळ आंब्यांचा थंडगार आस्वाद; अशा सोप्या पद्धतीने बनवा मँगो आईस्क्रीम!

सध्या आंब्यांचा सीजन सुरू आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वर्षातून एकदाच येणाऱ्या आंब्यांच्या सीजनचा मनमुराद आनंद खव्वये लुटतात. आंबा कापून, रस बनवून, मिल्कशेकमध्ये, आंबा बर्फी बनवून अशा विविध पद्धतीने त्याचा आस्वाद घेता येतो. मात्र उन्हाळ्यात आंब्याचे थंडगार आईस्क्रीम मनाला आणखीनच सुखावते. हे क्रीम आणि टेस्टी मँगो आईस्क्रीम आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीनेही बनवू शकतो. घरी क्रीमी मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी आंब्याचा रस, विपिंग क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र फेटून 8 तास फ्रीजरमध्ये सेट करा. हा सोपा उपाय बाजारासारखे मऊ (creamy) आईस्क्रीम देतो. यात दूध, कॉर्नस्टार्च, साखर आणि आंब्याचा पल्प वापरूनही उत्तम चव मिळते.

हेही वाचा : Mother's Day 2026 Wishes : ‘मदर्स डे’ निमित्त मनात दडलेल्या भावना व्यक्त करा 'या' खास शुभेच्छांनी, आणि आईचा दिवस बनवा खास

साहित्य – 

1 कप विपिंग क्रीम (Whipping Cream)
1 कप ताजा आंब्याचा रस/पल्प (हापूस आंबा उत्तम)
1/2 कप कंडेन्स्ड मिल्क 
1/4 कप पिठीसाखर (आंब्याच्या गोडीनुसार कमी-जास्त करा)

कृती – 

क्रीम फेटणे : एका भांड्यात थंड विपिंग क्रीम घेऊन इलेक्ट्रिक बीटरने 'सॉफ्ट पीक' येईपर्यंत फेटून घ्या.
मिश्रण तयार करणे : फेटलेल्या क्रीममध्ये आंब्याचा पल्प, कंडेन्स्ड मिल्क आणि पिठीसाखर घाला. सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत हळूवार फेटून घ्या.
सेट करणे : हे मिश्रण एका एअर-टाईट कंटेनरमध्ये ओता. झाकण लावण्यापूर्वी वरून अल्युमिनियम फॉइल किंवा प्लास्टिक रॅप लावा, जेणेकरून आईस्क्रीममध्ये बर्फाचे खडे (ice crystals) होणार नाहीत.
फ्रीझिंग : कंटेनर फ्रीजरमध्ये ७-८ तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी ठेवा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number