Thursday, November 13, 2025 08:29:02 AM

Side Effects Of Screen Time : सतत मोबाईल बघणाऱ्या लहान मुलांना 'हा' धोका संभवतो

ऑनलाईन गेम खेळणे, मोबाईलवर व्हिडिओ पाहणे किंवा ऑनलाईन अभ्यास करताना अनेकजण त्यांचा बराच वेळ स्क्रिनसमोर घालवतात.

side effects of screen time  सतत मोबाईल बघणाऱ्या लहान मुलांना हा धोका संभवतो

मुंबई: लहान असो किंवा मोठे, अनेकांना तासनतास स्मार्टफोन, टॅब्लेट आणि टीव्हीवर तासनतास वेळ घालवत असतात. ऑनलाईन गेम खेळणे, मोबाईलवर व्हिडिओ पाहणे किंवा ऑनलाईन अभ्यास करताना अनेकजण त्यांचा बराच वेळ स्क्रिनसमोर घालवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जास्त वेळ स्क्रिनसमोर राहिल्याने फक्त डोळ्यांनाच नाही, तर शरीराच्या इतर भागांनाही नुकसान होतो. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम: सतत स्क्रिनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि दृष्टी अस्पष्ट होते. दीर्घकाळात मायोपिया (दूरचा दृष्टीदोष) होण्याची शक्यता वाढते.

स्नायू आणि हाडे: स्क्रिनसमोर बसून राहिल्याने मान, पाठ आणि खांदे दुखणे सुरू होते. इतकंच नाही, तर शरीराची हाल कमी झाल्याने स्नायूंचा विकास थांबतो आणि हाडे कमकुवत होतात.

हृदय आणि लठ्ठपणा: बराच वेळ एकाच ठिकाणी बसून स्क्रिनला बघत राहिल्याने शारीरिक हालचाली कमी होतात. त्यामुळे, लठ्ठपणा, हृदयरोग आणि इतर समस्या उद्भवतात.  

झोपेवर होणारा नकारात्मक परिणाम: झोपण्यापूर्वी स्क्रिनवर प्रमाणापेक्षा जास्त वेळ घालवल्यामुळे झोप येण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, मुले चिडचिडे, रागीट होऊ लागतात. 

मानसिक आरोग्य असंतुलित होते: सोशल मीडिया आणि गेमिंगवर तासनतास वेळ घालवल्याने लहान मुले किंवा मोठी माणसे मानसिकदृष्ट्या कवकुवत होऊ लागतात. इतकंच नाही, तर एकटेपणाची समस्याही उद्भवते. 

हेही वाचा: Sea Salt Bath Health Tips : आंघोळ करण्यापूर्वी समुद्री मीठाच्या 'या' उपायाने तुम्हाला मिळतील अनेक फायदे

स्क्रिन टाईम कमी करण्यासाठी 'हा' उपाय फायदेशीर

वृत्तपत्र किंवा पुस्तक वाचणे: हा उपाय केल्याने लहान मुले असो किंवा मोठे, त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. 

मैदानी खेळ खेळणे: क्रिक्रेट, कबड्डी, खो-खो, लपंडाव, यासारख्या मैदानी खेळ खेळल्यामुळे मुलांचा शारीरिक विकास होतो. सोबतच, लहान मुलांची उंची वाढते आणि त्यांचा सर्वांगिण विकास होतो. 

मित्र-परिवारांना भेटणे: आपल्या जवळच्या मित्र-परिवारांना किंवा नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटल्याने, त्यांच्याशी वेळ घालवल्याने स्क्रिनटाईम कमी होण्यास मदत करते. यासह, आपल्या अवती-भवती सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. 

व्यायाम करणे: व्यायाम केल्याने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या लहान मुलं आणि मोठी माणसे निरोगी आणि ऊर्जावान राहतात.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री