सकाळ झाल्यावर अनेकांची सुरुवात कॉफीपासून होते. जगभरात कॉफीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. कॉफीचे नियमित सेवन केल्यामुळे अनेकांना कॉफी पिण्याची सवय लागते. कॉफी पिण्याची सवय लागल्यामुळे अनेकांना त्यातील नवनवीन फ्लेवर ट्राय करावेसे वाटते. जगात असे अनेक कॉफी आहेत, ज्या खूप चविष्ट आहेत, पण त्यासोबत महागदेखील आहे. या कॉफीच्या सेवनासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतील. या कॉफीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. मात्र कॉफी बनवण्याची पद्धत जाणून घेतल्यानंतर तुम्ही कॉफी पिणे बंद कराल. चला तर जाणून घेऊया भारतातील सर्वात महागडी कॉफी, जी चक्क प्राण्यांच्या मलमूत्रापासून बनवली जाते.
सिव्हेट कॉफी ही एक प्रकारची खास कॉफी आहे, जी आखाती देशांमध्ये आणि युरोपमध्ये खूप लोकप्रिय आहे. काही वर्षांपूर्वी, सिव्हेट कॉफीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केले असून ते लोकप्रिय ठरत आहे.
हेही वाचा: summer hair care tips: उन्हाळ्यात केसांची 'अशी' घ्या काळजी
सिव्हेट कॉफी कशी बनवली जाते:
सिव्हेट कॉफी जगातील सर्वात महागडी कॉफी म्हणून ओळखली जाते. कोपी लुवाक म्हणजेच सिव्हेट पिकलेल्या कॉफीच्या चेरी खातात. ही कॉफी नंतर तिच्या आतड्यांमध्ये एक अनोखी किण्वन प्रक्रिया पार पाडते. त्यानंतर, एक किंवा दोन दिवसांनी विष्टेच्या मार्गाने बाहेर येते. बाहेर आल्यानंतर याची कापणी केली जाते. कापणीनंतर प्रक्रिया केलेल्या बीन्सची सर्वात महाग कॉफी बीन्स म्हणून जगभरात विक्री केली जाते. या कॉफीची चव वेगळी असल्यामुळे अनेकांना ही कॉफी खूप आवडते. या कॉफीची किंमत महागडी असून या कॉफीच्या एका कपसाठी चक्क 6000 रुपये मोजावे लागतात.
भारतातील या ठिकाणी बनते सिव्हेट कॉफी:
1 - कूर्ग, कर्नाटक
2 - वायनाड, केरळ
3 - अरकू व्हॅली, आंध्र प्रदेश.
हेही वाचा: Custard Apple Benefits: सीताफळ खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
सिव्हेट कॉफी इतके महाग का आहे?
मर्यादित उत्पादन: ही प्रक्रिया जंगली सिव्हेट्सवर अवलंबून असते आणि फक्त थोड्या प्रमाणात बीन्स गोळा करता येतात.
अद्वितीय चव: त्याची गुळगुळीत, समृद्ध चव आहे ज्यामध्ये कॅरॅमल आणि चॉकलेटचे संकेत आहेत, ज्यामध्ये नियमित कॉफीची कडूपणा नाही.
श्रम-केंद्रित प्रक्रिया: संकलनापासून ते भाजण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक हाताळणी आवश्यक आहे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)