Beetroot Halwa Recipe: नुसतं बीट खाऊन कंटाळलात? अशा पद्धतीने बनवा स्वादिष्ट बीट हलवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

बीटरूट हलवा हा चविष्ट आणि पौष्टिक गोड पदार्थ असून चव आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. बीटमध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे हलव्याला सुंदर रंग आणि वेगळी चव मिळते.

Beetroot Halwa Recipe: नुसतं बीट खाऊन कंटाळलात? अशा पद्धतीने बनवा स्वादिष्ट बीट हलवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

बीटरूट हलवा हा चविष्ट आणि पौष्टिक गोड पदार्थ असून चव आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. बीटमध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे हलव्याला सुंदर रंग आणि वेगळी चव मिळते. यामध्ये आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असल्याने तो शरीरासाठी फायदेशीर ठरतो, विशेषतः हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त मानला जातो. गरमागरम हलवा खाण्याचा आनंद वेगळाच असतो, आणि बीटरूट हलवा हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. तूप, दूध, साखर आणि वेलचीमुळे त्याची चव अधिकच खुलते, तर काजू-बदामामुळे त्याला एक वेगळीच चव येते.घरच्या घरी सहज आणि कमी वेळात तयार होणारा हा हलवा सण-उत्सव किंवा जेवणानंतर गोड म्हणून सर्व्ह करता येतो. एकदा करून पाहिलात तर हा हलवा नक्कीच आवडेल, जाणून घेऊयात रेसिपी.

साहित्य:

दोन कप किसलेले बीट
एक कप दूध
अर्धा कप साखर (चवीनुसार)
दोन-तीन चमचे तूप
तीन-चार वेलची, किंवा वेलची पूड
किसलेले ड्रायफ्रूट्स 

कृती:

प्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात किसलेले बीट 5-7 मिनिटे परतून घ्या.
नंतर त्यात दूध घालून मध्यम आचेवर शिजू द्या.
दूध आटल्यावर त्यात साखर घाला आणि पुन्हा नीट ढवळा.
साखर वितळल्यानंतर हलवा घट्ट होईपर्यंत शिजवा.
शेवटी वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा.
आणि गरमागरम स्वादिष्ट बीटरूट हलवा खाण्यासाठी तयार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number