Tuesday, November 18, 2025 09:14:04 PM

Unique Station India: आता व्हिसाची कटकट विसरा; 'या ' स्टेशनवर उतरलं की काही मिनिटांतच परदेशात प्रवेश

भारत-नेपाळ सीमेजवळ असलेलं 'हे' भारतातील एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे जिथून प्रवासी काही मिनिटांतच थेट नेपाळमध्ये पोहोचू शकतात. विमानाशिवाय परदेश सफर करण्याचा हा एक अनोखा अनुभव.

unique station india आता व्हिसाची कटकट विसरा या  स्टेशनवर उतरलं की काही मिनिटांतच परदेशात प्रवेश

Jogbani Station: भारतात रेल्वे प्रवास म्हणजे फक्त सफर नाही, तर त्याच्याशी भावनिक नातंही जोडलेलं आहे. ट्रॅव्हलच्या दृष्टीनेही भारतीय रेल्वे दररोज नवे किस्से, नवे अनुभव देत असते. पण या विशाल नेटवर्कमध्ये एक असं स्टेशन आहे ज्याची ओळख बाकी सर्व स्टेशनपेक्षा वेगळी आणि खास आहे. कारण इथून फक्त काही मिनिटांच्या अंतरावर दुसरा देश लागतो. विमान प्रवास, पासपोर्ट, व्हिसा, इमिग्रेशनची रांग या सगळ्याशिवाय तुम्ही आपल्या देशातून थेट दुसऱ्या देशात जाऊ शकता. 

हे स्टेशन आहे जोगबनी. बिहारच्या अररिया जिल्ह्यात असलेलं हे स्टेशन भारत-नेपाळ सीमेचं शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं. जोगबनीपासून नेपाळ इतकं जवळ आहे की लोक अनेकदा स्टेशनवर उतरतात आणि तेथून पायी चालतच सीमेपलीकडे जातात. काही मिनिटांचं अंतर. एवढंच. एवढ्या सहजतेने एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचणं, तेही ट्रेनने, हे भारतभरात कुठेही मिळत नाही. म्हणूनच जोगबनीची ओळख ‘युनिक’ म्हणावी अशी आहे.

हेही वाचा: Hidden Travel Destinations: स्वर्गापेक्षा कमी नाही! भारतातील 5 अद्भुत ठिकाणं जिथे गर्दी नाही, फक्त शांतता आणि निसर्ग

नेपाळ आणि भारत यांच्यातील सीमारेषा खुल्या आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज लागत नाही. अनेक प्रवासी हीच गोष्ट सर्वात मोठी मानतात. कारण परदेशात जाणं म्हणजे आपल्याकडे सामान्य मनात एक मोठा खर्च, लांब प्रोसेस, सुरक्षा तपासणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असा विचार असतो. पण जोगबनीकडून नेपाळच्या दिशेने जाणारा मार्ग हा सगळा प्रसंग सोपा करतो. म्हणूनच काही जण नेपाळ ट्रिप सुरू करण्यासाठी सर्वप्रथम जोगबनी गाठतात.

जोगबनी स्टेशनवरून नेपाळची सिमा इतकी जवळ आहे की काही जण तर अगदी सामान हातात घेऊन थेट चालतच पलीकडे जातात. बाजारपेठ, दुकाने, बायका-मुलांची वर्दळ, नेपाळमधील चलन बदलणारी दुकानं, खाद्यपदार्थ विकणारे स्टॉल हे सगळं लगेच भेटू लागतं. त्यामुळे प्रवासाचा अनुभव इथे ट्रेन प्रवासाचा थांबत नाही, तर चालत्या-बोलत्या सरहद्दीचं दृश्यही स्वतः पाहायला मिळतं.

हेही वाचा: Travel Credit Card: विमान प्रवासात मोठी बचत! 'ही' 6 क्रेडिट कार्ड्स देतील सवलत, रिवॉर्ड्स आणि फ्री फ्लाइट व्हाउचर

भारतातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मचे रेकॉर्ड असलेली स्टेशनं आहेत, स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळवलेली स्टेशनं आहेत, काही station mega architecture साठी फेमस आहेत पण परदेशात चालत जाण्याची सुविधा देणारं स्टेशन फक्त एकच जोगबनी. त्यामुळे रेल्वे ट्रॅव्हल आणि बॉर्डर एक्सपिरियन्स दोन्ही एकाच वेळी अनुभवायचं असेल तर हे ठिकाण एकदम योग्य.

भारतात ट्रेनने परदेशात जाण्याचं एकच ठिकाण  हा अनुभव अनेकांना अजूनही अविश्वसनीय वाटतो. पण जोगबनीयातून रोज हे दृश्य घडतं. भारतापासून परदेशापर्यंतची ही ‘काही मिनिटांची’ सफर भारतीय रेल्वेच्या विशाल नेटवर्कमधला सर्वात अनोखा अध्याय म्हणावा लागेल.


सम्बन्धित सामग्री