Digital Detox म्हणजे मोबाईल सोडणं असं कित्येकांच्या मनात येऊन जातं पण, त्याचा खरा अर्थ मोबाईल अजिबात न वापरणं नाही तर मोबाईल आणि आपल्या दैनंदिन कामकाजात मोबाईल वापरण्याचा योग्य समतोल राखणं असा आहे. तर डिजिटल डिटॉक्स बद्दल अधिक जाणून घेऊया आणि तो करायचा कसा ते..
डिजिटल डिटॉक्स म्हणजे नेमकं काय?
दिवसभर सतत मोबाईल, सोशल मीडिया, रील्स, ओटीटी किंवा स्क्रीनवर राहण्याची सवय थोडी कमी करून स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे Digital Detox. यासाठी मोबाईल पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही; वापरावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं.
डिजिटल डिटॉक्स कसा करावा?
1. उठल्यावर लगेच फोन पाहू नका
सकाळी उठल्यानंतर पहिले 30 मिनिटे मोबाईलपासून दूर राहा.
2. झोपताना फोन बेडपासून दूर ठेवा
फोन हाताशी असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत स्क्रोलिंग सुरू राहतं. शक्य असल्यास फोन दुसऱ्या ठिकाणी चार्ज करा.
3. अति-महत्त्वाच्या नसलेल्या नोटेफिकेशन्स बंद करा
प्रत्येक नोटेफिकेशन तुमचं लक्ष विचलित करू शकतं. गरजेच्या अॅप्स सोडून बाकी नोटेफिकेशन्स बंद करा.
4. सोशल मीडिया साठी मर्यादित वेळ ठेवा
इंस्टाग्राम, युट्यूब किंवा इतर अॅप्स साठी रोज ठराविक वेळ निश्चित करा. स्वतःसाठी एक छोटं लक्ष्य ठेवा- आज कालपेक्षा 30 मिनिटे कमी स्क्रीन टाइम वापरण्याचा प्रयत्न करा.
5. जेवताना फोन वापरू नका
जेवताना मोबाईल बाजूला ठेवा. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत असाल तर त्यांच्याशी संवाद साधा.
6. दिवसातून काही वेळ फोन स्वतःपासून लांब ठेवा
दररोज 1 तास मोबाईलशिवाय राहण्याचा प्रयत्न करा. त्या वेळेत वाचन, चालणे, संगीत किंवा छंदासाठी वेळ द्या.
7. उठल्यावर आणि झोपण्याआधी स्क्रोलिंग टाळा
दिवसाची सुरुवात आणि शेवट रील्स किंवा सोशल मीडियाने करण्याऐवजी स्वतःसाठी ठेवा.
8. वीकेंडला मिनी डिजिटल डिटॉक्स करा
आठवड्यातून काही तास सोशल मीडिया पासून ब्रेक घ्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.