Thursday, June 11, 2026 09:26:50 PM

Green Tea Benefits: तुम्हीही रोज ग्रीन टी पिताय? दोन आठवड्यांत तणावमुक्तीचा मिळवा अनुभव; संशोधनातील धक्कादायक माहिती समोर

'ग्रीन टी'चे सेवन करणे हे हृदयाचे आरोग्य, लिव्हर आणि मानसिक शांततेसाठीही उपयुक्त मानली जाते.

green tea benefits तुम्हीही रोज ग्रीन टी पिताय दोन आठवड्यांत तणावमुक्तीचा मिळवा अनुभव संशोधनातील धक्कादायक माहिती समोर

'ग्रीन टी'चे सेवन करणे आता हेल्दी लाइफस्टाइलचा महत्त्वाचा भाग बनला आहे. वजन कमी करणे, शरीर डिटॉक्स ठेवणे, त्वचा सुधारणा आणि ऊर्जा वाढवणे अशा अनेक कारणांसाठी लोक ग्रीन टी पिणे पसंत करतात. जर एखाद्या व्यक्तीने सलग 15 दिवस दररोज ग्रीन टी घेतला, तर शरीरात काही सकारात्मक बदल दिसू शकतात.

ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे लिव्हर अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकते. विशेषतः जास्त तेलकट, गोड किंवा प्रोसेस्ड पदार्थ खाणाऱ्यांसाठी ग्रीन टी फायदेशीर मानला जातो. काही संशोधनांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील फॅटी लिव्हर असलेल्या लोकांना याचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

ग्रीन टीमध्ये असलेले अमिनो ॲसिड मेंदू शांत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तणाव कमी होतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. चहा किंवा कॉफीप्रमाणे अचानक ऊर्जा देऊन नंतर थकवा येण्याऐवजी ग्रीन टी शरीराला दीर्घकाळ टिकणारी हलकी आणि स्थिर ऊर्जा मिळवून देतो.

हेही वाचा: Deool Band 2 First Poster: 'देऊळ बंद 2'चं पहिलं पोस्टर रिलीज; दुचाकीवर स्वार झाले स्वामी, पोस्टरने वाढवली उत्सुकता

त्वचेच्या दृष्टीनेही ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरू शकते. यामधील अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेवरील मुरूम, काळेपणा आणि अकाली वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टीमुळे त्वचेतील अतिरिक्त तेलाचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे मुरूमांवर नियंत्रण मिळवणे सोपे होते.

वजन जास्त असल्यास 'ग्रीन टी'चा वापर करणे वजन कमी करण्यासाठी कोणताही चमत्कारिक उपाय नाही, मात्र यामुळे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया थोडी वेगवान करू शकते. विशेषतः व्यायामासोबत ग्रीन टी घेतल्यास शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया सुधारू शकते. दोन आठवड्यांत मोठा फरक जाणवणार नाही, पण पोटातील जडपणा कमी होणे आणि भूक नियंत्रणात राहणे यासारखे फायदे दिसू शकतात.

ह्रदय विकारांमध्ये ग्रीन टी हृदयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो. ग्रीन टी पिणे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करू शकते आणि रक्तवाहिन्या अधिक लवचिक बनवते. याचे परिणाम लगेच जाणवत नसले, तरी दीर्घकाळासाठी हृदय निरोगी ठेवण्यास ग्रीन टी मदत पिणे फायद्याचे ठरेल. 

(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)

हेही वाचा: Malad Fake Baba Case : आणखी एका भोंदूबाबाचा अघोरी अवतार! महिलांना फसवणाऱ्य 'मॉन्टी' बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


सम्बन्धित सामग्री