Winter Care: हिवाळा सुरू झाला की शरीराची त्वचा कोरडी पडणे ही सर्वात कॉमन प्रॉब्लेम लिस्ट असते. चेहरा, हात, ओठ यांना आपण लोशन, क्रीम वगैरे लावतो म्हणून त्यांचं थोडं मॅनेजिंग होतं. पण पायांच्या बाबतीत अनेक वेळा लोक लक्ष देत नाहीत. तळपायाची त्वचा हिवाळ्यात पटकन रुक्ष होते, कडक होते आणि रोजच्या चालण्यामुळे त्यात भेगा पडायला लागतात. सुरुवातीला फक्त थोडा रफपणा वाटतो पण जसजसा काळ जातो तस तळपाय कापल्यासारखं जाणवतं, दुखू लागतं आणि कधी कधी रक्तही येऊ लागतं. एवढा साधा वाटणारा छोटासा प्रॉब्लेम हिवाळ्यात खूपच त्रासदायक ठरू शकतो.
हेही वाचा: Hair Tips: हिवाळ्यात मेहंदी लावताय?, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा
खूप लोक मग यावर तात्काळ उपाय म्हणून महागड्या फुट क्रीम्स, स्पेशल पॅक, जेल, स्प्रे आणतात. काही जण गुगलवर मिळेल त्या सगळ्या रेमेडीज वापरायला लागतात. पण त्वचारोग तज्ञ सांगतात की अतिप्रयोग न करता, रोजचा छोटासा आणि सिम्पल रुटीन केलं तर तळपाय खूप सहज सॉफ्ट राहू शकतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी सुमारे दहा ते पंधरा मिनिटे कोमट पाण्यात पाय भिजवून ठेवले की त्वचा मऊ होते. पाण्यात सॉल्ट किंवा साबण टाकायचीही गरज नाही, अगदी साधं गरम पाणी पुरेसं असतं. त्यानंतर हलक्या हाताने ब्रशने किंवा स्क्रबरने सुकलेला थर काढून टाकावा. हे केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य मॉइश्चरायझर वापरणं. युरिया असलेलं मॉइश्चरायझर तळपायासाठी चांगलं मानलं जातं कारण यामुळे रफ झालेली त्वचा नरम होते, ओलावा जास्त वेळ टिकतो आणि भेगा हळूहळू भरायला मदत होते. क्रीम लावल्यानंतर शक्य असेल तर सॉक घालून झोपलं तर क्रीम व्यवस्थित पायात शोषलं जातं आणि सकाळी पाय खूप मऊ वाटतात.
हिवाळ्यात धूळ आणि मळ खूप लवकर पायावर चिकटतो, आणि आपण सतत शूज किंवा चप्पलमध्ये राहतो म्हणून ते जंतू तयार होण्याची शक्यता वाढते. जर स्वच्छता नसेल तर खाज येते, कधी कधी बॅक्टेरिया जमा होतात आणि नंतर फोडही होऊ शकतात. त्यामुळे तळपाय स्वच्छ ठेवणे ही बेसिक गोष्ट आहे, पण बहुतेक वेळा आपण विसरतो. दिवसातून एकदा तरी पाय स्वच्छ धुणं, रात्री मॉइश्चरायझर लावणं ही साधी रुटीन्स जर पाळली तर हिवाळ्यात पाय बेकार होणार नाहीत. प्रत्येक गोष्टीवर घरगुती प्रयोग करण्याची गरज नसते. काही पुरुष आणि अनेक महिला खूप वेगवेगळे नुस्खे वापरतात, कधी कधी एकमेकांना सांगतात पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकावर तेवढीच लागू होत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट उपयोगी वाटली तर ती सातत्याने वापरणं हे जास्त महत्त्वाचं आहे.
हेही वाचा:Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी आवळा फेस पॅक फायदेशीर, जाणून घ्या कसा बनवायचा?
जर तळपायाची भेग खूप खोल झाली असेल, चालताना खूपच त्रास होत असेल, रक्त जाणवत असेल तर मग घरगुती उपाय थांबवून डॉक्टरांचा सल्ला घेणेच जास्त योग्य ठरते. कारण काही वेळा फंगल इन्फेक्शन किंवा वेगळ्या समस्येमुळेही भेगा वाढतात. योग्य क्रीम, योग्य ट्रीटमेंट फक्त प्रोपर चेकअपनंतरच मिळते. पण सामान्य लाईट भेगा किंवा कोरड्या त्वचेसाठी साधा रुटीन हिवाळ्यात खूप फरक पाडतो. थंड हवेत शरीर ओलावा पटकन गमावते, त्यामुळे पायांची निगा हे ही हिवाळ्यातील सेल्फ केअरचा एक भाग आहे. सातत्य ठेवलं तर पाय पुन्हा मऊ, स्वच्छ आणि आरामदायी राहू शकतात.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)