Winter Skincare: थंडीची सुरुवात म्हणजे गुलाबी थंडी, गरम चहा आणि उबदार ब्लँकेट्सचा सीझन! पण या आनंदी हवेसोबत एक छोटंसं आव्हानही येतं त्वचेचा कोरडेपणा. हिवाळ्यात हवा कोरडी आणि थंड असल्याने शरीरातील ओलावा लवकर हरवतो, त्यामुळे त्वचा खेचल्यासारखी वाटते, खाज सुटते आणि कधी कधी त्वचेवर तडेही पडतात.
आपण यावर उपाय म्हणून अनेक महागड्या क्रीम्स, लोशन्स वापरतो, पण त्यांचा परिणाम तात्पुरता असतो. उलट, घरातील काही सोपे आणि नैसर्गिक उपाय दीर्घकाळ टिकणारी ओलावा देऊ शकतात. चला जाणून घेऊया असे 4 प्रभावी घरगुती उपाय, जे तुमची त्वचा पुन्हा मऊ आणि तजेलदार बनवतील.
हेही वाचा: Homemade Hair Oil: नैसर्गिक घटकांपासून बनवा केस वाढवणारं 'हे' हर्बल तेल, जाणून घ्या सोपी पद्धत
1. नारळाचे तेल: त्वचेसाठी नैसर्गिक कवच
नारळाचे तेल हा हिवाळ्यातील सर्वात उत्तम मॉइश्चरायझर मानला जातो. यात फॅटी अॅसिड्स असतात जे त्वचेच्या आत खोलवर पोषण देतात आणि ओलावा ‘लॉक’ करून ठेवतात.
कसा वापरावा?
आंघोळीनंतर अंग किंचित ओलसर असताना हलक्या हाताने नारळाच्या तेलाने मसाज करा.
फायदा: दिवसभर त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणा नाहीसा होतो.
2. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी: त्वचेसाठी हायड्रेशन टॉनिक
ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण म्हणजे हिवाळ्यातील ‘स्किन एलिक्सिर’. हे त्वचेला मऊ बनवते आणि ओलावा टिकवून ठेवते.
कसा वापर करावा ?
दोन्ही समप्रमाणात मिसळून मिश्रण तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला हलका मसाज करा आणि सकाळी धुऊन टाका.
फायदा: त्वचा मऊ, तजेलदार आणि ताजीतवानी दिसते.
3. मध आणि साय: नैसर्गिक चमक देणारा फेसपॅक
मध आणि साय या दोन्ही घटकांत नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्याचे गुण असतात.
कसा वापर करावा ?
थोडा मध आणि साय एकत्र करून चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाका.
फायदा: चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा ताजीतवानी दिसते.
हेही वाचा: Makeup Tips: चमकदार त्वचा हवी आहे? मेकअप करताना 'या' चुका नक्की टाळा
4. बदाम तेल :व्हिटॅमिन ईचा नैसर्गिक स्रोत
बदाम तेलात असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला आतून पोषण देतं आणि लवचिकता वाढवतं.
कसा वापर करावा ?
आंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने बदाम तेलाने मसाज करा.
फायदा: त्वचा गुळगुळीत होते, ताण जाणवत नाही आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
अतिरिक्त टिप्स:
-
दिवसभरात 8-10 ग्लास पाणी नक्की प्या. शरीरातील ओलावा टिकवण्यासाठी अंतर्गत हायड्रेशन महत्त्वाचे आहे.
-
साबण किंवा फेसवॉशचा वापर मर्यादित करा. कठोर घटक त्वचेचा नैसर्गिक ओलावा हिरावून घेतात.
-
झोपण्यापूर्वी हात, पाय आणि ओठांना नैसर्गिक तेल लावणे विसरू नका.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)