वयाची 30 वर्षे ओलांडली? महिलांनो, आरोग्याची काळजी घ्या! ‘या’ 5 तपासण्या का महत्त्वाच्या

दैनंदिन कामकाजात महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात, स्वतःचे आरोग्य जपणं हे त्यांना अनेकदा चुकीचे वाटते.

वयाची 30 वर्षे ओलांडली? महिलांनो, आरोग्याची काळजी घ्या! ‘या’ 5 तपासण्या का महत्त्वाच्या

दैनंदिन कामकाजात महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात, स्वतःचे आरोग्य जपणं हे अनेकदा त्यांना चुकीचे वाटते. परंतु बदलत्या हवामानाची स्थिती, रोजची धावपळ, घरकाम, कुटुंबातील सदस्यांची काळजी यात त्या इतक्या गुरफटतात की स्वतःचे स्वास्थ्य जपणं सहजपणे सोडून देतात.

मात्र वयाच्या 30 वर्षांनंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात. तसेच स्नायूंमध्ये गोळे येणे, वजन वाढणे, थकवा, केसगळती, त्वचेतील बदल, झोपेच्या समस्या आणि हाडांमधले कॅल्शियमचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे 30 नंतर दरवर्षी या 5 तपासण्या करणे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत गरजेचे आहे.

1. थायरॉईड टेस्ट – TSH, T3, T4
30 नंतर 10 पैकी 3 महिलांना थायरॉईडचा त्रास होतो. सतत थकवा येणे, वजन वाढणे किंवा केस गळणे ही थायरॉईडची लक्षणे आहेत. वर्षातून एकदा थायरॉईड तपासणी नक्की करा.

2. व्हिटॅमिन D आणि B12 ची तपासणी
सांधेदुखी, केस गळणे, सतत थकवा जाणवणे याचे मुख्य कारण व्हिटॅमिन D आणि B12 ची कमतरता आहे. उन्हात कमी जाणे आणि बदलती जीवनशैली यामुळे आज 80% महिलांमध्ये हे प्रमाण कमी आढळते.

हेही वाचा – गरब्याच्या तालावर थिरकताना गुडघे आणि घोट्यांवर येतोय ताण? ‘या’ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

3. पॅप स्मिअर टेस्ट – गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
हा कर्करोग सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाही. 30 नंतर प्रत्येक महिलेने दर 3 वर्षांनी एकदा Pap Smear टेस्ट करावी. वेळेत निदान झाल्यास हा कर्करोग 100% बरा होऊ शकतो.

4. ब्रेस्ट कॅन्सर तपासणी – ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन
भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दर महिन्याला स्वतः घरीच स्तनांची तपासणी करा आणि गाठ किंवा वेदना जाणवल्यास लगेच डॉक्टरांना भेटा. 35 नंतर मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे.

5. ब्लड प्रेशर आणि शुगर टेस्ट
कामाचा ताण, अनियमित जेवण यामुळे 30 नंतर BP आणि शुगर वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. ही तपासणी केवळ 5 मिनिटांत होते पण तुम्हाला हार्ट अटॅक आणि डायबिटीस सारख्या मोठ्या आजारांपासून वाचवू शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य जागरूकतेसाठी असून कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही)

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number