Sunday, April 27, 2025 07:21:05 PM

World TB Day: जनजागृती आणि प्रतिबंधासाठी महत्त्वाचे पाऊल

24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच (World TB Day) म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग म्हणजेच टीबी (Tuberculosis) हा जीवघेणा संसर्गजन्य रोग असून तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होतो.

world tb day  जनजागृती आणि प्रतिबंधासाठी महत्त्वाचे पाऊल

24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच (World TB Day) म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग म्हणजेच टीबी (Tuberculosis) हा जीवघेणा संसर्गजन्य रोग असून तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होतो. फुफ्फुसांवर हल्ला करणारा हा रोग योग्य वेळी निदान आणि उपचार न मिळाल्यास जीवघेणा ठरू शकतो. टीबी प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून पसरतो. संसर्गित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकामुळे हवेत पसरलेले जीवाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना हा रोग पटकन होतो.

टीबीची लक्षणे:
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा सततचा खोकला
छातीत दुखणे आणि दम लागणे
वजन कमी होणे आणि सतत थकवा येणे
रात्री जास्त घाम येणे आणि ताप येणे

हेही वाचा: विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना पडली एकटी..

जागतिक क्षयरोग दिनाचे महत्त्व: 
1882 मध्ये डॉ. रॉबर्ट कॉख यांनी टीबीचा जीवाणू शोधला होता. याचीच आठवण म्हणून २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. यावर्षीची थीम "Yes! We can end TB" (होय! आपण टीबी संपवू शकतो) अशी आहे.

क्षयरोग निर्मूलनासाठी सरकारची पावले:
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (National TB Elimination Program) अंतर्गत २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत करण्याचा सरकारचा निर्धार आहे.
रुग्णांना मोफत औषधे, पोषण आहार योजना आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) यांसारखी मदत पुरवली जाते.
निक्षय योजना अंतर्गत टीबी रुग्णांना पोषण सहाय्य देण्यासाठी दरमहा ५०० रुपये दिले जातात.

टीबी प्रतिबंधासाठी आवश्यक उपाय:
वेळेवर टीबीचे निदान करून योग्य उपचार घ्या.
खोकताना तोंड झाका आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा.
संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून प्रतिकारशक्ती वाढवा.
टीबी झालेल्या रुग्णांनी DOTS (Directly Observed Treatment, Short-course) उपचार पूर्ण करावा.

टीबी आजही गंभीर आरोग्य समस्या आहे. मात्र, योग्य उपचार आणि जनजागृतीच्या माध्यमातून तो पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या, क्षयरोगमुक्त समाज घडवा

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.


सम्बन्धित सामग्री