Mahapalika Election 2026 : महायुतीचे सूर जुळेनात, संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचा स्वबळाचा नारा; ठाकरे गटाला संधी?

मराठवाड्यातील सर्वात मोठी असलेल्या 115 जागांच्या या महापालिकेत युती व्हावी यासाठी दोन्ही बाजूंकडून मोठे प्रयत्न झाले. मात्र, अखेर जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही.

Mahapalika Election 2026 : महायुतीचे सूर जुळेनात, संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचा स्वबळाचा नारा; ठाकरे गटाला संधी?

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ अखेर निष्फळ ठरले असून, महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला पेच सुटण्याऐवजी तो अधिकच विकोपाला गेला आणि अखेर भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

10 बैठका होऊनही तोडगा नाही
मराठवाड्यातील सर्वात मोठी असलेल्या 115 जागांच्या या महापालिकेत युती व्हावी यासाठी दोन्ही बाजूंकडून मोठे प्रयत्न झाले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसह एकूण 9 ते 10 बैठकांचे सत्र पार पडले. मात्र, जागांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. भाजपच्या एका विशिष्ट प्रस्तावामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि काल संध्याकाळपासून युतीचे चित्र पालटले.

भाजपवर 'गाफील' ठेवल्याचा गंभीर आरोप
"भाजपने आम्हाला चर्चेत गुंतवून ठेवून स्वतःचे एबी (AB) फॉर्म भरण्याची तयारी केली होती," असा खळबळजनक आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळेच ही युती तुटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजेंद्र जंजाळ आणि विकास जैन यांसारख्या स्थानिक नेत्यांनीही भाजपवर 'दमकोंडी' करत असल्याचा दावा केला होता. भाजपने केवळ 37 जागांचा प्रस्ताव दिल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांनी अखेर स्वबळाचा मार्ग स्वीकारला.

हेही वाचा – BMC Election 2026 : एकनाथ शिंदेंना मोठा झटका, निष्ठावंत शिलेदाराचा पक्षाला रामराम, कॉंग्रेसमध्ये प्रवेश

भाजपचे स्पष्टीकरण: "शिवसेनेमुळेच युती तुटली"
दुसरीकडे, भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सावे म्हणाले की, "आम्ही 37 जागा देण्यास तयार होतो, मात्र ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आधीच निवडून आलेले आहेत, त्या जागांवरही शिवसेनेने दावा ठोकला होता. त्यांना युती करायचीच नाही हे आम्हाला आता कळाले आहे." भाजप आता आपल्या उमेदवारांना 'एबी' फॉर्म वाटण्याच्या तयारीत असून निवडणुकीच्या मैदानात दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

राजकीय गणिते आणि 'उद्धव सेने'ला संधी?
महायुतीमधील या बिघाडीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता तिरंगी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या वादामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून, याचा थेट फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार का? यावर आता राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सध्या संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली असून माजी महापौर नंदकुमार घोडले उमेदवारांची यादी अंतिम करत आहेत.

हेही वाचा – PMC Election : पुण्यात महायुतीत बिनसलं? भाजपसोबत गणित जुळेना.. धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number