Kokan Election Result 2025: कोकणात महायुतीचा झंझावात; भास्कर जाधवांना मोठा धक्का, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप-शिंदे सेनेचे वर्चस्व

कोकण पट्ट्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालांमध्ये महायुती, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा दबदबा स्पष्ट दिसून आला आहे.

Kokan Election Result 2025: कोकणात महायुतीचा झंझावात; भास्कर जाधवांना मोठा धक्का, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप-शिंदे सेनेचे वर्चस्व

रत्नागिरी: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना कोकण पट्ट्यात महायुती आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये महायुतीने मोठा दबदबा निर्माण केला असून अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांनी आपले गड राखण्यात यश मिळवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख नगरपंचायतीत नऊ पैकी सात नगरसेवक महायुतीचे विजयी झाले असून भाजपचा एक अपक्ष बंडखोर उमेदवारही निवडून आला आहे. गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या निकालामुळे शिवसेना नेते भास्कर जाधव यांना गुहागरमध्ये पराभव स्वीकारावा लागला असून, हा त्यांच्या राजकीय प्रभावाला मोठा धक्का मानला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड नगरपरिषदांवर शिवसेना (शिंदे गट) यांनी आपला झेंडा कायम राखला आहे. तसेच लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली आहे. देवरुख आणि गुहागर नगरपंचायतींवर भारतीय जनता पक्ष ने वर्चस्व सिद्ध केले आहे. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेस च्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवला आहे.

हेही वाचा: Bhagur Nagarparishad Election : भगूरमध्ये शिवसेनेला धक्का! राष्ट्रवादीने खातं उघडलं, प्रेरणा बलकवडे विजयी

रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस चे सुदेश कलमकर आघाडीवर असून, त्यांना 318 मते मिळाली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना (शिंदे गट) चे सुनील कविस्कर यांना 267 मते मिळाली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगरपरिषदेत भाजपने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. येथे शिंदे सेनेच्या लीना समीर म्हापणकर यांच्यासह भाजपचे रवींद्र रमाकांत शिरसाट, गौरी माईनकर, प्रीतम सावंत, विनायक गवंडकर, गौरी मराठे, आकांक्षा परब आणि तातोबा पालयेकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.

सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा गट यांच्यात मिश्र निकाल लागला आहे. भाजपच्या दिपाली भालेकर, सुधीर आडीवरेकर, दुलारी रांगणेकर, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर आणि मोहिनी मडगावकर यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे तौकीर शेख, शिंदे सेनेच्या सायली दुभाषी व खेमराज कुडतरकर, तर उबाठा गटाचे देवेंद्र टेमकर हे उमेदवारही निवडून आले आहेत.

मालवण नगरपरिषदेत भारतीय जनता पक्ष कडून मंदार केणी, दर्शना कासावकर, ललित चव्हाण आणि महानंदा खानोलकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडून दीपक पाटकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, निना मुंबरकर आणि शर्वरी पाटकर यांनी विजय मिळवला आहे. तर शिवसेना (उबाठा) गटाकडून अनिता गिरकर, अहेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर हे उमेदवार निवडून आले आहेत.

एकूणच कोकण पट्ट्यातील या निकालांनी महायुती, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची ताकद अधोरेखित झाली असून, आगामी राजकीय समीकरणांसाठी हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.

हेही वाचा: Maharashtra Nagar Parishad, Panchayat Election Result 2025: पिंपळनेरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष; सांगलीत शरद पवार गटाची मुसंडी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number