मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निमित्ताने आज दादर येथील शिवाजी पार्कात आज ठाकरे बंधूंची जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रथमच ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे या पक्षांची युती झाली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तब्बल 20 वर्षांसाठी एकत्रित सभा या शिवतीर्थावर होत आहे. दोन्ही पक्ष एकत्रितरित्या मुंबई महापालिकेसाठी लढत असून ही त्यांची या निवडणुकीतील दुसरी एकत्रित सभा आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आतापर्यंत राखून ठेवलेले सर्व मुद्दे मुंबईकरांसमोर मांडले.
हेही वाचा : Raj-Uddhav Sabha On Shivtirth : 'जे नाराज होऊन गेले आहेत, ते परत येतील'; राज ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
अदानींचा उद्योग वाढला कसा
भारताचा नकाशा बघा 2014 चा..., गौतम अदानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर यायच्या आधी अदानी कुठे होते. दहा वर्षात इतका श्रीमंत झालेला जगातील हा एकमेव उद्योगपती असेल. उद्योजकाने मोठं होऊ नये, इतका दळभद्री विचार मी करत नाही. पण इतके उद्योग एकाचा द्यायचे, याचं आश्चर्य वाटतं.