Monday, March 09, 2026 07:58:06 AM

Navnath Waghmare : तेलंगणामध्ये फुलेंचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न,नवनाथ वाघमारे यांची अमित शाह यांच्याकडे कारवाईची मागणी

तेलंगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाली असून नवनाथ वाघमारे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

navnath waghmare  तेलंगणामध्ये फुलेंचा पुतळा हटवण्याचा प्रयत्ननवनाथ वाघमारे यांची अमित शाह यांच्याकडे कारवाईची मागणी

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे. काही समाजकंटकांकडून महात्मा फुले यांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर नवनाथ वाघमारे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. 


यावेळी नवनाथ वाघमारे म्हणाले की, "मी कालच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं तेलंगणा राज्यामध्ये संगारेडी जिल्ह्यातील तेलापूर गावामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला जमीनदोस्त करण्यासाठी काही समाजकंठक घोळक्याने तिथे होते आणि अक्षरशः पोलीस तिथं असताना सुद्धा, ते पुतळा हटवण्याचा किंवा पुतळा पाडण्याचा प्रयत्न होतो. हे चाललंय काय राज्यामध्ये आणि देशामध्ये? या देशामध्ये खरंतर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज फुलेशाहू आंबेडकरांचे विचार संपवण्यासाठी कुठतरी हे या राज्याचे राज्यकर्ते याचा विचार करताय का? याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कळकळीची विनंती आहे, देशाच्या पंतप्रधानांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही तिथं जे कोणी ते समाजकंटक असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे".

"त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे आणि तेथील जो पुतळा आहे त्याची तात्काळ पुनस्थापना झाली पाहिजे. तिथं त्याला संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे त्याच सुशोभीकरण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. अन्यथा राज्यभर भाजप असेल किंवा भाजपच्या विचाराच्या आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आणि शाहू महाराजांच्या विचाराला विरोध करणाऱ्या लोकांचा आम्ही निषेध करत राहू आणि येणाऱ्या काळात त्यांना जशास तशी जागा दाखवण्यासाठी प्रयत्न करत राहू. त्यामुळे आम्ही कळकळीने विनंती करतोय की, तेथील तेलंगणातील त्या लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, आणि इथून पढे असं कृत्य कोणीही करणार नाही आणि इथून पुढे असं कृत्य घडणार नाही यासाठी तिथील राज्य सरकारने आणि केंद्रीय सरकारने जबाबदारी घ्यावी". 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या