Thursday, July 17, 2025 03:03:11 AM

हृदयविकाराच्या झटक्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करताना विद्यार्थ्याला झटका आला. ही चांदवड शहरातील धक्कादायक घटना आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

मालेगाव: हृदयविकाराच्या झटक्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करताना विद्यार्थ्याला झटका आला. ही चांदवड शहरातील धक्कादायक घटना आहे. 
घरी व्यायाम करताना एका 15 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रवीण धायगुडे असे या मुलाचे नावं असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे तो घरी व्यायाम करत असताना अचानक कोसळल्याने मोठा आवाज झाला म्हणून त्याची आई बघायला आली. यावेळी त्यांना प्रवीण गंभीर अवस्थेत दिसून आला. त्याला तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता प्रवीणची प्राणज्योत मावळली होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. 

हेही वाचा : Ashish Shelar: पहलगाममध्ये .....इथे लोकं जात विचारुन मारतायेत

घरी व्यायाम करताना विद्यार्थ्याला आला हार्ट अटॅक 
सध्या हृदय विकाराच्या झटक्याने तरुणांच्या मृत्यूच्या घटनामध्ये वाढ झाली असून मैदानात क्रिकेट,कब्बड्डी खेळताना, व्यायाम करताना, जिममध्ये तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना चांदवड शहरात घडली असून घरी व्यायाम करताना एका 15 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. प्रवीण धायगुडे असे मुलाचे नाव होते. तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. रोजच्या सवयीप्रमाणे तो घरी व्यायाम करत होता. व्यायाम करताना तो अचानक कोसळल्याने मोठा आवाज झाला. म्हणून त्याची आई  धावत आली. त्यावेळी प्रवीण त्यांना गंभीर अवस्थेत दिसून आला. त्यानंतर तातडीने प्रवीणला खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि प्रवीणचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 


सम्बन्धित सामग्री