मुंबई विमानतळाची धावपट्टी सहा तास बंद, 34 विमानांची उड्डाणे रद्द

वृत्तसस्था, मुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्टी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य आणि दुय्यम धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मुंबई विमानतळावरून रोज सुमारे 900 विमानांचे उड्डाण होते. या क्षमतेत वाढ करून दर दिवशी एक हजार विमान वाहतुकीचे लक्ष्य गाठण्यात येणार […]

मुंबई विमानतळाची धावपट्टी सहा तास बंद, 34 विमानांची उड्डाणे रद्द

वृत्तसस्था, मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्टी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य आणि दुय्यम धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मुंबई विमानतळावरून रोज सुमारे 900 विमानांचे उड्डाण होते. या क्षमतेत वाढ करून दर दिवशी एक हजार विमान वाहतुकीचे लक्ष्य गाठण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने दिली.

धावपट्टी बंद असल्याबाबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने (एमआयएएल) सर्व विमान कंपन्यांना गेल्या महिन्यात माहिती दिली होती. दोन दिवसांच्या प्रत्येकी सहा तासांमध्ये एअर इंडियाच्या 34 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर जेट एअरवेजच्य 6 आंतरराष्ट्रीय आणि 64 आंतरदेशीय विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली असून, 60 पेक्षा अधिक विमानांच्या वेळा बदलल्या आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number