Local Train Accident : नियतीचा घाला! घर गाठण्याआधीच काळाने हिरावले,25 वर्षीय चित्राचा दुर्दैवी मृत्यू

सोगावच्या लेकीचा कसारा लोकलमध्ये दुर्दैवी मृत्यू
25 वर्षीय महिलेचा रेल्वेतून पडून मृत्यू

भिंवडी : रेल्वेतून पडून अवघ्या 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची असल्याची हृदयद्रावक घटना शहापूर तालुक्यातून समोर आली आहे. वासिंद आणि आसनगाव रेल्वे स्थानकादरम्या जिंदाल कंपनीजवळ रेल्वेतून पडून या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घरी परतलीच नाही…
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव चित्रा प्रतीक देसले असून त्या सोगाव-किनवली या परिसरातील रहिवासी होत्या. रोजच्याप्रमाणे त्या रेल्वेने प्रवास करत असतानाच ही दु्र्दैवी घटना घडली आहे. धावत्या रेल्वेतून तोल जाऊन त्या थेट रुळावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Dog Bite : छत्रपती संभाजीनगरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत! अवघ्या 22 दिवसांत तब्बल 585 नागरिकांना चावा, घाटी रुग्णालयातील आकडेवारीने वाढवली चिंता

जखमी अवस्थेत असलेल्या चित्रा यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

अपघाताचे नेमकं कारण काय?
महिलेच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, वासिंद ते आसनगाव या रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. लोकल गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी,वेळेवर गाड्या न येणे तसेच धावत्या गाडीत चढण्याच्या-उतरण्याच्या प्रयत्नात अशा घटना होत असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेता प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या या घडलेल्या अपघाताचे नेमके कारण काय होते, महिला घसरुन पडली की गर्दीमुळे ढकलली गेली, याचा तपास रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version