Chhatrapati Sambhajinagar : भटक्या कुत्र्यांची दहशत! तीन वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; ओळखूही येईना अशी बालकाची अवस्था

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारातील एका पोल्ट्री फार्मवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सार्थक (उत्कर्ष) गजानन पाटील असे मृत बालकाचे नाव आहे. सार्थकचे कुटुंब चार महिन्यांपासून वेरूळ शिवारातील पोल्ट्री फार्मवर राहत होते. या घटनेच्या वेळी वडील गजानन पाटील हे पोल्ट्री फार्ममध्ये कामात व्यस्त होते. तर आई घरातील कामे […]

Chhatrapati Sambhajinagar : भटक्या कुत्र्यांची दहशत! तीन वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; ओळखूही येईना अशी बालकाची अवस्था

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारातील एका पोल्ट्री फार्मवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सार्थक (उत्कर्ष) गजानन पाटील असे मृत बालकाचे नाव आहे. सार्थकचे कुटुंब चार महिन्यांपासून वेरूळ शिवारातील पोल्ट्री फार्मवर राहत होते. या घटनेच्या वेळी वडील गजानन पाटील हे पोल्ट्री फार्ममध्ये कामात व्यस्त होते. तर आई घरातील कामे करत होती. सार्थक घराबाहेरील अंगणात एकटाच खेळत असताना काही भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्याला फरफटत नेल्याचे लक्षात येताच, वडिलांनी धाव घेऊन कुत्र्यांना पिटाळून लावले. परंतु तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच, खुलताबाद पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राकेश आव्हाड यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या घटनेनंतर, स्थानिक रहिवाशांनी परिसरातील मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची तीव्र मागणी केली आहे.   

हेही वाचा : Jalgaon Crime: जळगाव हादरलं! जमिनीच्या वादातून पुतण्याने सख्ख्या काकाचा घेतला जीव; मृतदेह…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number