लातूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लातूरमधील 34 विद्यार्थ्यांना तब्बल 28.23 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील 'विजय' नर्सिंग स्कूलचा संचालक आरोपी शरद जाधव किणीकर याने त्याच्या नर्सिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या तब्बल 34 विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध शासकीय कार्यालयात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 34 विद्यार्थ्यांची फसवणूक करून तब्बल 28 लक्ष 23 हजारांचा गंडा घातला. दरम्यान, फसवणुकीतील रकमेचा आकडा जवळपास 2 कोटी 50 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आरोपी शरदला मदत करणारी त्याची पत्नी अंजली जाधव किणीकर व दिल्ली येथील व्यक्ती या गुन्ह्यात समाविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पीडित सिद्धांत बनसोडे व साक्षी वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शरद जाधव किनीकरला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनवली आहे. या गुन्ह्यातील त्याची पत्नी आरोपी अंजली जाधव किणीकर अद्याप फरार आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण करत आहेत.
हेही वाचा : Sushma Andhare On Phaltan Docter Death Case: 'या' लोकांना चौकशीच्या कक्षात घेणार का?, अंधारेंचा पोलीस उपअधीक्षक खांबेंना सवाल