पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता- पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांकडून त्यांना अटक केली. अटक केलेल्या पाच जणांना पोलीस आज कोर्टात हजर करणार आहेत. आरोपींमध्ये एका माजी आमदाराच्या पुत्राचाही समावेश आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने राहत्या घरात गळफास घेतला. हगवणे पिता- पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना बावधन पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पाच जणांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. अटकेतील आरोपींमध्ये एका माजी आमदाराच्या पुत्राचाही समावेश आहे. अटक टाळण्यासाठी हगवणे पिता पुत्र 17 मे पासून 22 मे पर्यंत लपून राहिले होते. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर आता त्यांना साथ देणाऱ्यांनाही गजाआड करण्यात आले आहे.
हेही वाचा : वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; कारागृह अधिक्षक बक्सार मुलानींची बदली
हगवणे पिता पुत्रांना मदत करणाऱ्यांची नावे
1) मोहन भेगडे, मित्र
2) बंडू फाटक, पवना डॅमजवळील फार्म हाऊसचा मालक
3) अमोल जाधव, पुसेगावमध्ये फार्म हाऊसवर आसरा देणारा
4) राहुल जाधव, पुसेगावमध्ये हगवणे फार्म हाऊसवर आसरा देणारा
5) प्रीतम पाटील, कर्नाटकातील कोननोळीमध्ये मदत करणारा (प्रीतम हा माजी आमदाराचा मुलगा आहे)
सुशील हगवणे व राजेंद्र हगवणेंनी 17 तारखेपासून कसा केला प्रवास?
17 तारखेला आलिशान इंडीवर गाडीतून राजेंद्र हगवणे हॉस्पिटलला गेले. त्यानंतर थार या गाडीतून मुहूर्त लॉन्स येथे गेले. नंतर याच गाडीतून वडगाव मावळकडे प्रवास केला. पुढे पवना डॅमकडे रवाना झाले व तेथेच फार्म हाऊसवर मुक्काम केला. त्यानंतर थार गाडीतून आळंदी येथे गेले व एका लॉजवर मुक्काम केला. त्यानंतर 18 तारखेला पुढे याच धार गाडीतून वडगाव मावळ येथे गेले. वडगाव मावळ येथे बंडू फाटक यांच्याकडे बलेनो गाडीने गेले. 19 तारखेला पुसेगावकडे हे दोघेही जण रवाना झाले. पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर हे दोघेही गेले. नंतर पसरणी मार्गे कोगनोळी येथे 19 व 20 तारखेला हॉटेल हेरिटेज येथे मुक्काम केला. त्यानंतर पुढे 21 व 22 तारखेला प्रीतम पाटील मित्राच्या शेतावर मुक्काम केला. पुढे 22 ला रात्री पुण्याकडे रवाना झाले व पुण्यातील मुहूर्त लॉन्स या ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.