अमरावती: प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री पंकजा मुंंडे आंदोलनाला भेट देणार आहेत. तसेच बच्चू कडू सायंकाळी महत्त्वाची घोषणा करणार आहेत.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज 7 दिवस पूर्ण झाले आहेत. शुक्रवारी महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तर बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर अद्यापही ठाम आहेत. आज तोडगा निघणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करू आणि या समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दरम्यान आज बच्चू कडू प्रहारचे प्रमुख पदाधिकारी व ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्याशी बोलून आंदोलन सोडायचं की पुढे करायचं यावर निर्णय घेणार आहेत. आज सकाळी 10 वाजता मंत्री उदय सामंत तर दुपारी 2 वाजता मंत्री पंकजा मुंडे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट देणार असून बच्चू कडू आज सायंकाळी महत्त्वाची घोषणा करणार आहेत.
हेही वाचा : Today's Horoscope: आजचा दिवस कोणत्या राशींसाठी संघर्षाचा असणार, जाणून घ्या...
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज 7 वा दिवस आहे. शुक्रवारी महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर अद्यापही ठाम आहेत. आज अन्नत्याग आंदोलनावर तोडगा निघणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करू व या समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आज बच्चू कडू प्रहारचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्याशी बोलून आंदोलन सोडायचं की पुढे चालू ठेवायचं यावर निर्णय घेणार आहेत.
बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या काय?
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी. शेतमालाला एमएसपीवर (MSP) 20 टक्के अनुदान देण्यात यावे. दिव्यांग आणि विधवा महिलांना 6 हजार मानधन मिळावे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना समान निकष द्यावे. तसेच मेंढपाळ - मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यात यावे. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थिक सहाय्य करण्यात यावे अशा मागण्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केल्या आहेत.