Saturday, June 14, 2025 04:39:15 AM

....रक्ताळलेली गुणपत्रिका

दहावीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गावगुंड्यांच्या विकृतीला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. नुकताच दहावी परीक्षेचा निकाल लागला असून त्यात मुलीने पहिला क्रमांक मिळवला आहे.

रक्ताळलेली गुणपत्रिका

बारामती : दहावीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गावगुंड्यांच्या विकृतीला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. नुकताच दहावी परीक्षेचा निकाल लागला असून त्यात मुलीने पहिला क्रमांक मिळवला आहे. मात्र ते पाहायला ती या जगात नाही. बारामतीच्या कोऱ्हाळे खुर्द गावातील ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. 

नुकताच  दहावीचा  निकाल लागला. निकालात अनेकांनी दैदीप्यमान यश मिळवले. दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे एकीकडे कौतुक सुरु असतानाच बारामतीमध्ये मात्र दहावीत प्रथम आलेल्या मुलीच्या पालकांना अश्रु अनावर झाले आहेत. दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून 8 एप्रिल रोजी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगळवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मृत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे.  आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या चार आरोपींपैकी फक्त एकालाच अटक झाली आहे. लेकीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवत आहेत.  

हेही वाचा : आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

अंकिताच्या आत्महत्येनंतर अजूनही तिचे कुटुंब या दु:खातून सावरु शकले नाही. अंकिता इयत्ता पहिलीपासून पहिल्याच क्रमांकावर राहिलेली आहे. दहावीच्या परीक्षेतसुद्धा तिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. मात्र ते पाहायला ती आज या जगात नाही असे अंकिताच्या आईने म्हटले आहे. तसेच अंकिताला न्याय मिळावा अशी मागणी देखील तिच्या आईने केली आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना अंकिताच्या आईला अश्रू अनावर झाले. अंकिताचा दहावीच्या परीक्षेत पहिला नंबर आला. मात्र ती आज हयात नाही. तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. एकाला अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत. त्यांनाही लवकरात लवकर अटक व्हावी. अंकिता न्याय मिळाल्यावरच खऱ्या अर्थाने तिच्यासाठी श्रद्धांजली ठरेल. असे अंकिताचे वडिल शंकर कडाळे यांनी सांगितले आहे. 


सम्बन्धित सामग्री