Thursday, February 12, 2026 07:13:35 PM

Pune Grand Cycle Tour Accident: पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये विचित्र अपघात; 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले, पाहा व्हिडीओ

यामध्ये 70 पेक्षा जास्त सायकलपटू एकमेकांवर धडकले असून, अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

pune grand cycle tour accident पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये विचित्र अपघात 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले पाहा व्हिडीओ

Pune Grand Cycle Tour Accident:  पुण्यातील 'पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर'ला आज अपघाताचे गालबोट लागले. मुळशी तालुक्यातील कोळवण रस्त्यावर अरुंद मार्ग आणि तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने एक भीषण साखळी अपघात झाला. यामध्ये 70 पेक्षा जास्त सायकलपटू एकमेकांवर धडकले असून, अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमका अपघात कसा झाला?

स्पर्धा कोळवण रोडवरून जात असताना हा थरार घडला. ताशी 60 ते 70 किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना अचानक समोर आलेल्या अरुंद रस्त्याचा अंदाज आला नाही. आघाडीवर असलेल्या एका सायकलपटूचा ताबा सुटला आणि त्यापाठोपाठ वेगाने येणारे इतर खेळाडू एकावर एक कोसळले. अपघाताचा वेग इतका जास्त होता की अनेक खेळाडू रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

जखमी खेळाडूंवर उपचार

प्राथमिक माहितीनुसार अपघातात जखमी झालेल्यांपैकी 4 ते 5 खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. इतर अनेक खेळाडू किरकोळ जखमी झाले आहेत. या गोंधळानंतर स्पर्धा साधारण 15 मिनिटे थांबवण्यात आली होती, मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यावर ती पुन्हा सुरू करण्यात आली.

हेही वाचा - Pune Satara Highway: पुणे-सातारा मार्गावरील धोकादायक 'एस' वळण होणार इतिहासजमा, दुहेरी बोगद्यांमुळे वेळही वाचणार

प्रशासनाचा हलगर्जीपणा की नियोजनाचा अभाव?

एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. कोळवण रोडवरील धोकादायक वळणांची माहिती खेळाडूंना आधी का देण्यात आली नाही? असा प्रश्न आता खेळाडूंकडून विचारण्यात येत आहे. तथापी, वळणावर आवश्यक बॅरिकेडिंग आणि धोक्याच्या सूचना देणारे फलक नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वेगवान स्पर्धेसाठी रस्त्याची रुंदी पुरेशी आहे की नाही, याची तांत्रिक तपासणी झाली होती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
 


सम्बन्धित सामग्री