अहिल्यानगर शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत नोकरीला लावतो या आमिषाने बोलवून घेऊन अहिल्यानगर शहर तसेच पुणे जिल्ह्यात शिरूर येथे लॉजवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तू दुसरं लग्न केलंस ना, मग मी पण...’ मायलेकीत कडाक्याचं भांडण; आईने थेट गळाच आवळला, नेमकं काय घडलं?
एवढच नव्हे तर मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढायला सांगून तासनतास पाहत रहायचा या त्रासाला कंटाळून तरुणीने अभिषेक कळमकर यांच्याविरोधात पोलिसात दिली तक्रारा दिली. त्याचप्रमाणे अत्याचार करताना व्हिडिओ काढून त्याद्वारे व्हिडिओ व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या अभिषेक कळमकर विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- Bank Locker Scam: बँक लॉकरमधून तब्बल 60 लाखांचे दागिने गायब! महिलेच्या दाव्याने खळबळ; पोलिसांकडून कसून तपास सुरू
दरम्यान त्या पीडित तरुणीने पोलिसांना पुरावे म्हणून व्हिडिओ सदर केले. यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल होताच पोलिस माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान राजकीय पदावर असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने अहिल्यानगरमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.