‘दादा परत या…’, काळीज पिळवटून टाकणारा बारामतीकरांचा टाहो; अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी लाखोंचा समुदाय उपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला. यानंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी रात्री 10 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.

‘दादा परत या…’, काळीज पिळवटून टाकणारा बारामतीकरांचा टाहो; अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी लाखोंचा समुदाय उपस्थित

महाराष्ट्राचे वित्त मंत्री, बीड आणि पुण्याचे पालकमंत्री, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी पसरल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा- Ajit Pawar Death : 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस…, अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी आकड्यांचा योगायोग समोर

यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव दुपारी बारामती रुग्णालयातुन हलवले असून अजित पवार यांचे पार्थिव ठेवण्यासाठी काचेची पेटी रूग्णालयात आणण्यात आली. अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये हलवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी रात्री 10 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांच्या अंतिम दर्शासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

हेही वाचा- Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या अपघाताचं गुढ उलगडणार; अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स फॉरेन्सिक टीमच्या हाती

अंतिम दर्शनासाठी राज्यातील नेते या ठिकाणी आलेत तसंच जय पवार आणि श्रीनिवास पवार याठिकाणी आले आहेत. अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात रात्री 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यात येत आहे. त्यानंतर उद्या, गुरुवारी सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. आज मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे बारामतीत दाखल झाले आहेत. उद्या पंतप्रधानदेखील उपस्थित राहणार आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number