Nagpur Crime : केबिनमध्ये गेले ते बाहेर आलेच नाही आत जाऊन पाहिलं तर…; नागपुरात डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, मृतदेहाजवळ सापडली ‘ती’ गोष्ट

नागपुरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून नातेवाईकांची चौकशी आणि मोबाईलची तपासणी सुरू आहे. 

Nagpur Crime :  केबिनमध्ये गेले ते बाहेर आलेच नाही आत जाऊन पाहिलं तर…; नागपुरात डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, मृतदेहाजवळ सापडली ‘ती’ गोष्ट

नागपुरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 42 वर्षीय डॉ. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार असं मृतक डॉक्टरच नाव असून ते न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नियमित कामे पूर्ण करून डॉक्टर कक्षात गेले होते. मात्र दीड ते दोन तास ते बाहेर न आल्याने सहकाऱ्यांना संशय आला, आणि सहकारी ज्यावेळेस त्यांना पाहायला डॉक्टर कक्षात गेले तेव्हा कक्षात डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले.

हेही वाचा- Qatar Gas Plant Explosion : कतारमधील गॅस प्लांटच्या स्फोटात 12 भारतीयांचा मृत्यू; दूतावासाची माहिती

प्रेमविवाह केलेल्या डॉ. चांदेवार यांना 15 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्याकडे प्रशासकीय विभागाचाही कारभार होता. त्यांनी आयुर्वेद शाखेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली आणि तत्काळ पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना तपासात घटनास्थळी बधिरीकरणाचे इंजेक्शन आढळल्यान, इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान डॉक्टर काही दिवसांपासून तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती होती.

त्यामुळे कौटुंबिक तणावातून आत्महत्येचे पाऊल उचलले का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. इंजेक्शनचा ओव्हरडोजमुळे आत्महत्या केली की हृदयविकाराचा झटका आला याचे अंदाज लावले जात आहेत. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून नातेवाईकांची चौकशी आणि मोबाईलची तपासणी सुरू आहे. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून नातेवाईकांची चौकशी आणि मोबाईलची तपासणी सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number