Uddhav-Raj Thackeray Interview: "ज्यांना मुंबई वेगळी करायची आहे, ते महानगरपालिकेत आले तर मराठी माणूस…" राज ठाकरेंनी ‘तो’ मुद्दा आडपडदा न ठेवता मांडला

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु असताना राज ठाकरे यांनी मुंबईकरांना विचार करायला लावणारा हा मुद्दा उपस्थित केला आहे. 

Uddhav-Raj Thackeray Interview: &quotज्यांना मुंबई वेगळी करायची आहे, ते महानगरपालिकेत आले तर मराठी माणूस…&quot राज ठाकरेंनी ‘तो’ मुद्दा आडपडदा न ठेवता मांडला

राज्यात महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची ‘दैनिक सामना’ मध्ये संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली. ही मुलाखत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार आणि चित्रपट निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती, मराठी माणसाचे अस्तित्व, मुंबईचे प्रश्न आणि आगामी महापालिका निवडणुका यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु असताना राज ठाकरे यांनी मुंबईकरांना विचार करायला लावणारा हा मुद्दा उपस्थित केला आहे. 

हेही वाचा- Uddhav-Raj Thackeray Interview: “ती एकच गोष्ट एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण” ‘सामना’च्या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी रोखठोक सांगितले

यावेळी राज ठाकरे म्हणाले की. “महाराष्ट्रातील स्थिती आज गंभीर झालीय. देवेंद्र फडणवीस नागपूरचे. बाकीचेही सगळे बाहेरचे. जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येतात, तेवढे आधी येत नव्हते. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर उत्तरेतून जवळपास रोज 56 ट्रेन महाराष्ट्रात येतात. भरून येतात आणि रिकाम्या जातात. आज जर तुम्ही ठाणे जिल्हा पहा. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, यांचा डोलारा फक्त मोदींवर अवलंबून आहे! भिवंडी, त्यात पालघर जिल्हा वेगळा पकडू नका. वसई-विरार, मीरा-भाईंदर… म्हणजे जवळपास 8 ते 9  महापालिका आहेत. याची सुरुवात होते ग्रामपंचायत, पंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका या सर्व गोष्टी लोकसंख्येनुसार वाढत जातात. आज मुंबईत एक महानगरपालिका आहे, पुण्यात दोन आहेत. ठाणे जिल्ह्यात 8 ते 9  महानगरपालिका. याचं कारण काय? याचं कारण बाहेरून येणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण. तेच प्रमाण मुंबईत वाढतंय. अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भागतीय, हिंदू करणार? हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही तर आपले मतदार संघ तयार करत आहेत, आणि तेच चित्र आज दिसतयं.. जी जुनी जखम आहे की, मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र्य करण, वेगळी करण, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पुर्ण करता येईल याच्यासाठी या लोकांचा हा सगळा खटाटोप चालू आहे. संयुक्त चळवळीच्या वेळेस जे वातावरण होत की, मुंबई गुजरातने मागणं तेच वातावरण आता आहे. ज्यांची इच्छा आहे की, महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करावी, ते केंदात आहेत, राज्यात ते आणि जर महानगरपालिकेत सुद्धा तेच आले तर मला नाही वाटत मराठी माणूस काही करू शकेल”. राज ठाकरेंनी मांडलेल्या या भूमिकेमुळे मराठी माणलासा विचारात टाकले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number