Nagpur Leopard: नागपुरात दाट वस्तीतील घरात शिरला बिबट्या; छोट्याशा अलोकने सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग

सकाळी साडेनऊ पासून सुरू झालेला हा थरार अखेर चार तासांनी संपला. अलोक नावाच्या लहान मुलाने सुरुवातील आपल्या घरातील दरवाजाच्या बाजूला बिबट्याची शेपटी पाहिली.

Nagpur Leopard: नागपुरात दाट वस्तीतील घरात शिरला बिबट्या; छोट्याशा अलोकने सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग

Nagpur Leopard: नागपुरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील भांडेवाडी या दाट वस्तीच्या परिसरात राऊत यांच्या घरात थेट दुसऱ्या माळ्यावर शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सकाळी साडेनऊ पासून सुरू झालेला हा थरार अखेर चार तासांनी संपला. अलोक नावाच्या लहान मुलाने सुरुवातील आपल्या घरातील दरवाजाच्या बाजूला बिबट्याची शेपटी पाहिली. त्यानंतर त्याने याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. विशेष म्हणजे कोणताही आरडाओरडा न करता अलोकने सतर्कतेने हा सर्व प्रकार हाताळला. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा – Dharashiv Tuljapur : आरोपींसाठी भाजपची दारं उघडी! ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार

या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांनी वन विभागाला यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, हेल्प फॉर अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूर येथील संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बिबट्याच्या उपस्थितीची खात्री करून टीटीसी सेंटरला याबाबत माहिती दिली. यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

हेही वाचा – Anjali Damania : पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ?; अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसर सुरक्षित करण्याचे आणि नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून एका पिंजऱ्यात जेरबंद केलं. त्यानंतर त्याला गोरेवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला नेण्यात आले. तब्बल दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. यानंतर परिसरातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number