आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा वाटेतच अडवला, पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप; काही विद्यार्थी रुग्णालयात दाखल

आदिवासी आश्रमशाळांमधील मुंबईच्या दिशेने निघालेला विद्यार्थ्यांचा मोर्चा ठाणे हद्दीत अडवण्यात आला.

आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा वाटेतच अडवला, पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप; काही विद्यार्थी रुग्णालयात दाखल
adivasi students

भिवंडी : आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षण, भोजन आणि सुरक्षेच्या प्रश्नांवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘उलगुलान मोर्चा’चा आज, सोमवारी आठवा दिवस होता. मात्र, ठाणे हद्दीत हा मोर्चा अडवण्यात आला. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा आंदोलकांनी केला असून, यावेळी विद्यार्थ्यांसोबत धक्काबुक्की झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री सुमारे एक वाजता पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जाण्यास सांगितल्यानंतर विद्यार्थी पुढे निघाले. मात्र ठाणे हद्दीत त्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : सोलापूरात मोठी खळबळ! ठाकरे गटाचे उपनेते वर्षभरासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

या कारवाईदरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भिवंडी बायपास परिसरात सोडण्यात आले. त्यानंतर भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, जबाब नोंदवल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. आश्रमशाळांमधील शिक्षण व्यवस्था सुधारावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पौष्टिक जेवण मिळावं, सेंट्रल किचनची व्यवस्था बंद करून आश्रमशाळांमध्येच भोजन तयार करण्यात यावं, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य सुविधा द्याव्यात, सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. तसेच त्यांच्या आदिवासी विभागातील मंत्री, आयुक्त आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र, आंदोलनाचा मार्ग अडवल्याने आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचत नसल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number