Friday, February 13, 2026 01:33:06 AM

Girish Mahajan On Farmers Protest : लाल वादळ मुंबईच्या दिशेने; शिष्टमंडळाशी चर्चा काय? गिरीश महाजन म्हणाले...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री गिरीश महाजन आणि किसान मोर्चाचे शिष्टमंडळ दाखल झाले असून किसान सभेच्या लाँग मार्च शिष्टमंडळासोबत नुकतीच मंत्रालयात बैठक पार पडली आहे.

girish mahajan on farmers protest  लाल वादळ मुंबईच्या दिशेने शिष्टमंडळाशी चर्चा काय गिरीश महाजन म्हणाले

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा निघालेला लॉन्ग मार्च रात्रीच्या मुक्कामानंतर आता मनोरहून पालघरकडे निघाला आहे. आज दिवसभरात 30 किलोमीटरच अंतर पार करत हे लाल वादळ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. जिल्हाधिकारी किंवा मंत्र्यांशिवाय कोणाशी बोलणार नाही अशी भूमिका घेत आमदार विनोद निकोले यांनी हा लॉन्ग मार्च पुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसापासून सुरू असलेले माकपचे आंदोलन, मागण्या मान्य झाल्याने स्थगित केल्याचे आमदार विनोद निकोले यांनी सांगितले आहे. मागील सात तासांपासून आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागले असून काही निर्णयासाठी वेळ घेतला असल्याचे यावेळी सांगितले. 

हेही वाचा- Borivali National Park: संजय गांधी नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांवरील कारवाई स्थगित; वनमंत्री गणेश नाईक यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री गिरीश महाजन आणि किसान मोर्चाचे शिष्टमंडळ दाखल झाले असून किसान सभेच्या लाँग मार्च शिष्टमंडळासोबत नुकतीच मंत्रालयात बैठक पार पडली आहे. यावेळी शिष्टमंडळासोबत मंत्री गिरीश महाजन हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यासाठी दाखल झाले. किसान मोर्चाचे नेते अजित नवले , माजी आमदार जे पी गावीत, माकपचे आमदार विनोद निकोले , अशोक ढवळे आणि इतर शेतकरी नेते हे यावेळी उपस्थित होत. बैठकीत किसान सभेच्या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. वन जमिनी कायद्यात सुधारणा, सात बारा नावावर, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मागणी, शाळा वाढवण्याची मागणी, पाणेयाची कमकरता, नदी जोड प्रकल्प हवे, पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा विषय या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी माध्यमांशी बोलत असताना गिरीश महाजन यांनी किसान सभेचा जो लॉन्ग मार्चा निघाला आहे त्यांची मागणी काय आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून प्रश्न सोडवणार असल्याची माहिती दिली आहे.


सम्बन्धित सामग्री