पुण्यात पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात 27 वर्षीय दीप्ती मगर चौधरी या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. पुण्यात काही दिवसांपूर्वीच वैष्णवी हगवणे या विवाहितेनेही अशाच प्रकारे जीव दिला होता, ती घटना ताजी असतानाच आता दीप्तीच्या मृत्यूने समाजात संतापाची लाट पसरली आहे.
यानंतर या घटनेसंदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे.
हेही वाचा- Pune Crime : महाराष्ट्र हादरला! 50 तोळे सोने अन् 35 लाख देऊनही विवाहितेचा छळ; पुण्यातील सरपंचाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या मुलीनंतर दिप्ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने तिच्या मनाविरुद्ध तिची गर्भलिंग तपासणी केली. मात्र दुसऱ्यांदा दिवस गेल्यानंतर तिने गर्भलिंग तपासणीस नकार दिल्यामुळए तिला त्याच अवस्थेत पतीने मारहाण केली होती. त्यानंतर तिला म्हणण्यात आलं की, आम्हाला आमच्या वंशाला दिवा हवा आहे. तुला गर्भलिंग तपासणी करायची नसेल तर आमच्या घरातून चालती हो.. असं म्हणत तिला गर्भलिंग तपासणीसाठी जबरदस्ती करण्यात आली. तपासणीत पोटातील बाळ हे मुलगी असल्याचे समजल्यावर सासरच्यांनी जबरदस्तीने तिचा गर्भपात केल्याची तक्रार ही दिप्तीने केली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, लोणी काळभोर पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- Malad Crime: त्या मालाड स्थानक घटनेतील प्राध्यापकाचे थेट संरक्षणमंत्र्यांशी कनेक्शन; बातमी समजताच...
नेमकं प्रकरण काय?
7 वर्षांपूर्वी सोन्या-नाण्याने मढवून आणि लाखो रुपये खर्च करून दीप्तीचा विवाह अत्यंत शाही थाटात पार पडला होता. तिची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडीच्या विद्यमान सरपंच असून सासरे कारभारी चौधरी हे पेशाने शिक्षक आहेत. सासरचे प्रतिष्ठित घर असल्याने दीप्तीच्या वडिलांनी लग्नात 50 तोळे सोने हुंडा म्हणून दिले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच दीप्तीचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींनी दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. "तू दिसायला सुंदर नाहीस" आणि "तुला घरातील कामे येत नाहीत" असे टोमणे मारून तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींना एकदा 10 लाख रुपये रोख आणि त्यानंतर गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते. दरम्यान, छळाची सीमा ओलांडली गेल्याने दीप्तीने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आपल जीवन संपवलं. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.