New Born Baby Girl : काळीज पिळवटून टाकणारी घटना, नवजात बालिकेला उघड्यावर बेवारस सोडलं; पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

विजय चिडे, प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा येथे अवघ्या काही तासांच्या जिवंत नवजात बालिकेला उघड्यावर बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने नवजात बालिकेला जंगला तांडा शिवारात सोडून दिल्याचे समोर आले. बालिकेला त्यागण्याच्या उद्देशाने तिला उघड्यावर सोडून संबंधित व्यक्तीने तेथून पळ काढल्याचा […]

New Born Baby Girl : काळीज पिळवटून टाकणारी घटना, नवजात बालिकेला उघड्यावर बेवारस सोडलं; पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा येथे अवघ्या काही तासांच्या जिवंत नवजात बालिकेला उघड्यावर बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने नवजात बालिकेला जंगला तांडा शिवारात सोडून दिल्याचे समोर आले. बालिकेला त्यागण्याच्या उद्देशाने तिला उघड्यावर सोडून संबंधित व्यक्तीने तेथून पळ काढल्याचा संशय आहे. हा प्रकार लक्षात येताच जंगला तांड्याच्या पोलीस पाटील संगीताबाई गोरख राठोड यांनी तातडीने फर्दापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बालिकेला सुरक्षित ताब्यात घेतले आणि पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, एवढ्या लहान बाळाला उघड्यावर सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस पाटील संगीताबाई राठोड यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा : Nanded Crime : नांदेड हादरलं! शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number