शिंदेंच्या ऑफिसबाहेर कचऱ्याचा ढीग; ‘जय महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीवर अधिकाऱ्याची अरेरावी

एकीकडे, पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे.

शिंदेंच्या ऑफिसबाहेर कचऱ्याचा ढीग; ‘जय महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीवर अधिकाऱ्याची अरेरावी

मुंबई: एकीकडे, पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे. जेव्हा, ‘जय महाराष्ट्र’चे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी शिंदेंच्या कार्यालयाशेजारील कचऱ्याचा ढीग दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यापासून रोखले. तसेच, रोहिणी खडसे यांनी गुरुवारी सायंकाळी एक्सवर पोस्ट केली, ज्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला असलेला कचऱ्याचा ढीग दाखवला आहे. 

‘जय महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीवर अधिकाऱ्याची अरेरावी

‘जय महाराष्ट्र’चे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांना चित्रीकरण करण्यापासून रोखण्यात आले. 

रोहिणी खडसेंची ‘एक्स’ पोस्ट

शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गुरुवारी सायंकाळी एक्सवर पोस्ट केली, ज्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला असलेला कचऱ्याचा ढीग दाखवला आहे. 

‘सध्या राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मा. उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या दालनापासून अवघ्या 50 फुटांवर हा कचऱ्याचा ढीग आहे. आज सकाळी माध्यमांनी विधीमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे ही बाब समोर आणली. त्यानंतर अपेक्षा होती विधिमंडळ परिसरात असलेला कचरा तत्काळ उचलला जाईल. मात्र झालं उलट यांनी आपल्या चुका लपवण्यासाठी माध्यमांना वार्तांकन करण्यापासून रोखलं आणि या ठिकाणी कचरा झाकण्यासाठी मोठे पडदे लावले. लपवाछपवी करण्यात या सरकारला अवॉर्डच दिले पाहिजे. आपल्या चुका सुधारणार नाहीत पण त्यावर पांघरूण घालण्यात हे माहीर आहेत’, अशी टीका रोहिणी खडसे यांनी एक्सच्या माध्यमातून केली.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number