Nagpur News : एका क्षणात होत्याच नव्हत झालं! निष्काळजीपणा निष्पाप चिमुकल्याचा जीवावर बेतला

नागपुरातून एक हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पाणी समजून टरपेंटाईन पिल्याने अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

Nagpur News : एका क्षणात होत्याच नव्हत झालं! निष्काळजीपणा निष्पाप चिमुकल्याचा जीवावर बेतला

नागपुरातून एक हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पाणी समजून टरपेंटाईन पिल्याने अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीडगाव परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. अद्वविक शाम भदाडे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. घरात काही दिवसांपूर्वी पेंटिंगचं काम झालं होतं.

त्यावेळी वापरासाठी आणलेली टरपेंटाईनची बाटली स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आली होती. 12 एप्रिल रोजी सायंकाळी खेळता-खेळता अद्वविक त्या ठिकाणी पोहोचला आणि बाटलीतलं द्रव पाणी समजून त्याने टरपेंटाईन प्राशन केलं. टरपेंटाईन पिल्यानं त्याची प्रकृती झपाट्याने खालावली ज्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने त्याला पारडी येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती गंभीर असल्याने मेडिकलमध्ये हलवण्यात आलं.

हेही वाचा- Solapur Crime : तिच्यासोबत बोलायचंय म्हणत आत नेल अन्…; फैजानने लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यातचं पत्नीसोबत केलं भयानक कृत्य

पण उपचार सुरू असतानाच या निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, भदाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घरात ठेवले जाणारे टरपेंटाईन, आम्ल, कीटकनाशके यांसारखे घातक पदार्थ मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा कारण यात झालेल दुर्लक्ष दोन वर्षीय चिमुकल्याचा जीवावर बेतलं आहे. त्यामुळे लाहान मुलांचा बाबतीत असलेला निष्काळजीपणा जीवघेणा ठरला यावरून काळजी घेण्याच आवाहन पालकांना करत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number