धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या नववधू-वराला मृत्यूने कवटाळे. साखरपुडा झाल्यानंतर सुखी संसारची स्वप्न पाहणारे या तरुण जोडप्यावर काळाचा घात झाल्याची बातमी समोर आली आहे. वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय शिनगारे वयवर्षे 25 आणि इजोरा येथील मुलगी अक्षया सुनील चव्हाण वयवर्षे 23 यांचा रविवारी 15 फेब्रुवरीला मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा पार पडला.
हेही वाचा- Namo Bharat Train Inauguration: ताशी 180 किमी वेग आणि बुलेट ट्रेनसारख्या सुविधा; पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली-मेरठ RRTS मार्ग आणि मेरठ मेट्रोचे उद्घाटन
अक्षयाला आज म्हणजेच रविवारी 22 फेब्रुवारीला लातूर येथे महापारेषणची परीक्षा देण्यासाठी जायचे होते. त्यासाठी दोघेही पहाटे वाशी येथून लातूरकडे निघाले होते. मात्र सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथील रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार टोलवेच्या कमानीवर जाऊन जोरात धडकली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जखमी चालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
हेही वाचा- Hardik Pandya: विभक्त होऊनही जबाबदारीत कसर नाही; हार्दिकने नताशा आणि मुलाला दिली आलिशान कार भेट, किंमत ऐकून व्हाल थक्क
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की परिसरात काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या आणि नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवलेल्या एका तरुण जोडप्याचा धाराशिव येथे भीषण अपघातात मृत्यू झाल्याची काळजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच अचानक आलेल्या या दुर्दैवी बातमीने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाचे वातावरण एका क्षणात शोकाकुल झाले असून नातेवाईक व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.