Ratnagiri Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जनासाठी नदीत उतरला, पण परतलाच नाही! रत्नागिरीत तरुणाचा बुडून मृत्यू; बचावासाठी आजोबांची धडपड Video Viral

देशभरात गणरायाच्या आगमनाप्रमाणेच आता विसर्जनाची देखील जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. अशातच गणेशोत्सवाच्या आनंदी आणि भक्तिमय वातावरणाला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील माभळे गावात दुर्दैवी घटनेने गालबोट लागले आहे. घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थ उत्साहात विसर्जनस्थळी पोहोचले होते. याचदरम्यान संबंधित तरुण […]

Ratnagiri Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जनासाठी नदीत उतरला, पण परतलाच नाही! रत्नागिरीत तरुणाचा बुडून मृत्यू; बचावासाठी आजोबांची धडपड Video Viral
रत्नागिरीत गणपती विसर्जनावेळी बुडालेल्या तरुणाचा व्हिडिओ समोर

देशभरात गणरायाच्या आगमनाप्रमाणेच आता विसर्जनाची देखील जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. अशातच गणेशोत्सवाच्या आनंदी आणि भक्तिमय वातावरणाला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील माभळे गावात दुर्दैवी घटनेने गालबोट लागले आहे. घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थ उत्साहात विसर्जनस्थळी पोहोचले होते. याचदरम्यान संबंधित तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथे गणपती विसर्जनावेळी बावनदीपात्रात गणपती विसर्जन करताना प्रज्वल घडशी याचा बुडून मृत्यू झाला होता. या दुर्दैवी दुर्घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

CRIME : गणपती विसर्जनाला गालबोट; मंडळ अध्यक्षाचा मृत्यू, दोन दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळं वळण

नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने प्रज्वल काही क्षणांत पाण्यात बुडाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला वाचवण्यासाठी आजोबांनीही नदीत उडी घेतल्याचं व्हिडिओत कैद झालं आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी नदीपात्रात करण्यात आलेल्या उत्खननामुळे हा खड्डा निर्माण झाल्याचा आरोप प्रज्वलच्या कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे माभळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने गणपती विसर्जनावेळी नागरिकांनी पाण्यात उतरताना विशेष खबरदारी घेण्याची आणि प्रशासनाच्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number