Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल बस ट्रकमध्ये घुसली; एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ पहाटे साडेपाच वाजता भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी वैजापूरच्या घाटी रुग्णालयात दाखल […]

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल बस ट्रकमध्ये घुसली; एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ पहाटे साडेपाच वाजता भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी वैजापूरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्स बस छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. वैजापूर परिसरात आल्यानंतर बसने पुढे चाललेल्या कंटेनर ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय 65, रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट! पुढील 5 दिवस मुसळधार सरींचा अंदाज; या’ जिल्ह्यांना इशारा

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number