Wednesday, November 19, 2025 01:28:12 PM

Satara Doctor Case : फलटण डॉक्टर अत्याचार प्रकरणात नवीन ट्विस्ट; आरोपी पीएसआय गोपाल बदने अखेर पोलिसांसमोर हजर

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणी अत्याचारप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

satara doctor case  फलटण डॉक्टर अत्याचार प्रकरणात नवीन ट्विस्ट आरोपी पीएसआय गोपाल बदने अखेर पोलिसांसमोर हजर

सातारा: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणी अत्याचारप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टर तरूणीच्या अत्याचारानंतर तब्बल काही दिवसांपासून फरार असलेला आरोपी पीएसआय गोपाल बदने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला. 

पोलिसांनी गोपाल बदनेला ताब्यात घेतले आणि जवळपास एक तास त्याची चौकशी केली. तसेच, चौकशीनंतर बदनेला वैद्यकीय तपासणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मेडिकलसाठी नेत असताना बदने माध्यमांसमोर आला आणि त्याने हात जोडून प्रतिक्रिया दिली की, 'या प्रकरणात मला विनाकारण अडकवले जात आहे'. 

 

दरम्यान, डॉक्टर तरुणीच्या अत्याचारप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. प्रशांतला पुण्यातून अटक करण्यात आली असून तो त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला होता. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित डॉक्टर तरुणीने आपल्या तळहातावर गंभीर आरोप लिहून घेतले होते. त्यांनी थेट दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे लिहिली होती, पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा: SBI Beed Robbery: धारूरमध्ये SBI बँकेत शेतकऱ्याच्या खिशातून 50 हजार रुपयांची चोरी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:ला संपवण्यापूर्वी डॉक्टर तरुणीने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात तिने पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने यांच्याबाबत गंभीर खुलासे केले. तसेच, पीडित डॉक्टर तरुणीने असा आरोप केला की, 'पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केला'. पीडितेच्या आत्महत्येनंतर पीएसआय बदने आणि प्रशांत बनकर फरार होते. शेवटी पोलिसांनी त्यांना बेड्या ठेकल्या. पुढे या प्रकरणात काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री