Mini Mobile Racket : गुप्त माहिती…अनेक दिवसांची रेकी…अन् मिनी मोबाईल रॅकेटचा पर्दाफाश! ‘ऑपरेशन सजग’च्या माध्यमातून महिला पोलिसांची कारगिरी

जुगल पाटील, प्रतिनिधी  जळगाव : जळगाव शहरातील काही शाळांबाहेर सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा उलगडा जळगाव पोलिसांच्या 'ऑपरेशन सजग' या विशेष मोहिमेतून झाला आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथकाने अनेक दिवस सिव्हिल ड्रेसमध्ये रेकी करत हा प्रकार समोर आणला. पोलिसांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी तात्पुरते स्टॉल उभारून अतिशय छोटे, सहज लपवता येणारे मिनी मोबाईल विकले जात होते. […]

Mini Mobile Racket : गुप्त माहिती…अनेक दिवसांची रेकी…अन् मिनी मोबाईल रॅकेटचा पर्दाफाश! ‘ऑपरेशन सजग’च्या माध्यमातून महिला पोलिसांची कारगिरी

जुगल पाटील, प्रतिनिधी 

जळगाव : जळगाव शहरातील काही शाळांबाहेर सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा उलगडा जळगाव पोलिसांच्या 'ऑपरेशन सजग' या विशेष मोहिमेतून झाला आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथकाने अनेक दिवस सिव्हिल ड्रेसमध्ये रेकी करत हा प्रकार समोर आणला. पोलिसांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी तात्पुरते स्टॉल उभारून अतिशय छोटे, सहज लपवता येणारे मिनी मोबाईल विकले जात होते. तसेच स्वतःचा मोबाईल नसलेल्या काही अल्पवयीन विद्यार्थिनींना पैसे घेऊन मित्र, बॉयफ्रेंडला कॉल करून देणे, मोबाईल स्टॉलवरच ठेवून देणे आणि चार्जिंगसाठीही पैसे आकारण्याचा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती संबंधित पालक आणि मुख्याध्यापकांनाही देण्यात आली असून, शाळांबाहेर संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने दामिनी पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हे प्रकरण दामिनी पथकाच्या पोलीस महिला कर्मचारी वैशाली माळी यांनी उघडकीस आणले असून याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे आणि सामाजिक कार्यकर्ती मोनाली पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

हेही वाचा : Shiv Sena Corporator Resignation : शिवसेनेला धक्का! नवी मुंबईच्या 5 नगरसेवकांचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द; लवकरच शिंदेंनाही भेटणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number