Aditi Tatkare PRO Death: धक्कादायक! मंत्री अदिती तटकरे यांच्या PROचा अचानक मृत्यू; जेवणानंतर चालायला गेले अन्…

मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत पीआरओ म्हणून काम करणारे आशिष मेटे यांचा भांडूपमध्ये अचानक कोसळून मृत्यू झाला. डोक्याला गंभीर मार लागल्यानंतर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Aditi Tatkare PRO Death: धक्कादायक! मंत्री अदिती तटकरे यांच्या PROचा अचानक मृत्यू; जेवणानंतर चालायला गेले अन्…

भांडुप: मंत्री अदिती तटकरे यांच्याशी जनसंपर्काच्या कामानिमित्त जोडलेले आशिष मेटे यांचा भांडूपमध्ये अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या आवारात फेरफटका मारत असताना ते अचानक जमिनीवर कोसळले. यावेळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर आशिष मेटे इमारतीच्या परिसरात चालत होते. त्याचवेळी अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आशिष मेटे हे मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयात थेट सरकारी कर्मचारी नव्हते. ते एका पब्लिक रिलेशन कंपनीच्या माध्यमातून पीआरओ म्हणून काम करत होते आणि प्रसिद्धी तसेच जनसंपर्काशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळत होते.

दरम्यान, या घटनेची नोंद भांडूप पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सध्या कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे आशिष मेटे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number