Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणींसाठी अदिती तटकरेंची मोठी घोषणा; e-KYC संदर्भात दिली ‘ही’ मोठी अपडेट

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांना आणखी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणींसाठी अदिती तटकरेंची मोठी घोषणा; e-KYC संदर्भात दिली ‘ही’ मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana:  'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'त अर्ज मंजूर असूनही केवळ तांत्रिक अडचणी किंवा अपूर्ण ई-केवायसीमुळे मासिक 1500 रुपयांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांना आणखी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कागदपत्रांतील त्रुटी त्वरित दुरुस्त करण्याचे आवाहन
अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही माहितीमधील विसंगती किंवा तांत्रिक त्रुटींमुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकलेले नाहीत, ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे मिळालेल्या या अतिरिक्त वेळेत महिलांनी आपल्या अर्जातील व कागदपत्रांतील चुका लवकरात लवकर दुरुस्त करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र असणाऱ्या एकाही महिलेला योजनेच्या लाभापासून दूर राहावे लागू नये, यासाठी शासन स्तरावर सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Railway Rule Change From 1 August: रेल्वे प्रवाशांचा मनस्ताप संपणार; 1 ऑगस्टपासून 'तत्काळ' तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल

हप्त्याच्या रकमेतील वाढ आणि इतर राजकीय घडामोडींवर वक्तव्य
दरम्यान, या योजनेअंतर्गत मिळणारी मासिक आर्थिक मदत वाढवण्यात यावी, अशी मागणी काही स्तरातून केली जात आहे. यावर बोलताना मंत्री तटकरे यांनी सांगितले की, मानधनात वाढ करण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून सरकार योग्य वेळी याबाबत निर्णय घेईल. याच वेळी त्यांनी दिल्लीत सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आणि त्यांच्या विविध मागण्यांवरही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाष्य केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number