#MeToo चं लोण आता सिंबॉयोसिसमध्येही! विद्यार्थिनींचे खळबळजनक दावे

लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या #MeToo या चळवळीचं लोण आता महाविद्यालय क्षेत्रात येऊन पोहोचलं आहे. पुण्यातील ‘सिम्बॉयोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन’ या विभागातून लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आला आहे. या विभागात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींनी सोशल मीडियात तक्रारी मांडल्या असून शिक्षकावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिला अपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला […]

#MeToo चं लोण आता सिंबॉयोसिसमध्येही! विद्यार्थिनींचे खळबळजनक दावे

लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या #MeToo या चळवळीचं लोण आता महाविद्यालय क्षेत्रात येऊन पोहोचलं आहे. पुण्यातील ‘सिम्बॉयोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन’ या विभागातून लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आला आहे. या विभागात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींनी सोशल मीडियात तक्रारी मांडल्या असून शिक्षकावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

#MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिला अपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला जगासमोर आणत आहेत. #MeToo ही लैंगिक शोषणाविरोधातील मोहिम आता भारतातही जोर धरू लागली आहे. मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातून काही महिलांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड केल्याने देशभरात खळबळ माजली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर आलेल्या तक्रारीनंतर सिम्बॉयोसिस प्रशासनाने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक खुलासा जाहीर केला आहे. यामध्ये ‘महाविद्यालयाचा परिसर लैंगिक शोषण मुक्त रहावा यासाठी आम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहोत’ असं म्हटले आहे. याशिवाय सिम्बॉयोसीस प्रशासनाने माफीनामा सादर करत दिलगीर व्यक्त केली आहे. तसंच ज्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण झालं आहे, त्यांनी पुढे येऊन या घटनेच्या तपासासाठी नेमलेल्या समितीसमोर येऊन तक्रारी द्याव्यात, असं आवाहन केलं आहे.

 

यावर आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, यापूर्वीही सिम्बायोसिस कॅम्पसमध्ये अशा घटना घडल्या आहेत. सिंबॉयोसिसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर यांनी अशा घेतनेबाबत संबधित प्राध्यापक यांच्यावर कडक कारवाई केली आहे. जरी या घटना पुढे उशीरा येत असल्यातरी सिंबॉयोसिस प्रशासनाने संबधित प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच ‘मी टू’ च्या चळवळीच्या माध्यमातून समोर येणाऱ्या सर्व घटनांवर मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमोटो दखल घेऊन चौकशी करण्यात यावी. या घटनांच्या बाबत वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करून कारवाई करण्यासंदर्भात सूचना देण्याची विनंती केली आहे.

 

या पुढे आ.डॉ.गोऱ्हे यांनी एका गंभीर प्रश्न कडे लक्ष वेधतात त्या म्हणाल्या की, सर्व कॉलेज तसेच संस्थांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समित्या आहेत. कायद्यानुसार या समितीत स्वयंसेवी संस्था व महिला हिताशी निगडित संस्था संबधित एक व्यक्ती समितीचा सभासद असणं आवश्यक आहे.परंतु असे होत नसून या नियमाचे उल्लंघन संस्था करते असल्याचे दिसत आहेत असे आ.डॉ.गोऱ्हे या म्हणाल्या. याबाबत शासनाने योग्य ती कारवाई करण्याबाबत पोलिसांना आदेश देण्याची विनंती देखील त्यांनी केली.

 

विशेष म्हणजे लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा  हा सर्व प्रकार चार ते पाच वर्षांपूर्वी विमाननगर येथील कॅम्पसमध्ये घडला आहे. मात्र हा शिक्षक,शिक्षक इतर कर्मचारी आणि क्लासमधील मित्र यांनी केलाय. त्यामुळे आता सिंबॉयोसिस कडून समिती नेमण्यात आलीय तो काय अवहाल देतात ते पहावं लागेल. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number