हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो पाठोपाठ आता पुन्हा एक मोठा निर्णय; लाखो कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार सुसाट

Hinjewadi-Shivajinagar Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोपाठोपाठ आयटी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हिंजवडीतील मेट्रो स्थानकांपासून आयटी पार्कमधील कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो पाठोपाठ आता पुन्हा एक मोठा निर्णय; लाखो कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार सुसाट
Major Road Plan After Hinjewadi Metro

पुणे : पुण्यातील आयटी पार्क हिंजवडीमध्ये काम करत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरु होण्यापूर्वीच प्रवाशांच्या शेवटच्या टप्प्यातील प्रवास सोपा करण्यासाठी मोठे नियोजन करण्यात आलेले आहे.

ट्रॅफिक जाममधून सुटका मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो स्थानकापासून थेट कंपनीच्या गेटपर्यंत पोहोचण्यासाठी आता थेट 21 रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे. हिंजवडीमधील असलेल्या 8 महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या या सर्व रस्त्यांची एकणू लांबी ही सुमारे 20 किलोमीटर असणार आहे. फक्त मुख्य रस्त्यावर अवलंबून न राहता, आयटी पार्कच्या आतल्या भागातूनही स्थानकापर्यंत जाता यावे, हा याच मागता मुख्य उद्देश आहे. या योजनेत जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच डागडुजीसोबतच काही नवे अंतर्गत रस्ते देखील बांधले केले जाणार आहे.

प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या 500 मीटर ते 1.5 किलोमीटरच्या परिसरातील रस्ते हे यातच घेतले गेले आहेत. मेगापोलिस सर्कल स्थानकासाठी आयटी पार्क फेज-3, क्रिकेट ग्राउंडकडे जाणारा रस्ता शिवाय भोईरवाडी मार्गासर साधारण 4 किलोमीटरचे काम हे होणार आहे. तर क्वाड्रंट सर्कल स्थानकासाठी फेज 3 मधील दोन रस्त्यांसह 3.6 किलोमीटरचे जाळे तयार केले जाणार आहे.

पण ऑफिसपर्यंत कसं पोहोचणार?
हिंजवडी मेट्रोच्या खालील मुख्य रस्ता हा साधारण 10 किलोमीटरचा आहे, जो पाहिला तर एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या हद्दीत येतो. या संपूर्ण कामासाठी राज्य सरकारने तब्बल 426 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केले आहे. मेट्रोमुळे शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवास हा वेगवान होणार असला तरी, स्टेशनपासून ऑफिसपर्यंत चालत जाणे हे कर्मचाऱ्यांसाठी थोडे कठीण जाणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number